14 Lane High Speed Road Near Atal Setu Saaam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Travel: मुंबई- पुणे प्रवास होणार सुसाट, अटल सेतूला एक्स्प्रेस वे जोडणार, अवघ्या २ तासांत पुण्यात पोहचणार; वाचा सविस्तर

14 Lane High Speed Road Near Atal Setu: अटल सेतूजवळ १४ पदरी रस्ता बांधण्यात येणार आहे. यामुळे मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट होणार आहे. अवघ्या २ तासांत पुण्यात पोहचणे शक्य होणार आहे.

Priya More

Highway Atal Setu, JNPT to direct Pune, Satara: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी अटल सेतू (Atal Setu) या समुद्री पुलाजवळ १४ पदरी रस्ता बनवण्याबाबतची घोषणा केली होती. या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गामुळे मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट होणार आहे. त्याचसोबत यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील (Mumbai-Pune Express Way) वाहनांची गर्दी लक्षणीयरित्या कमी होईल. या नव्या महामार्गामुळे पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि बंगळुरूला जाणं अतिशय सोपं होणार आहे.

शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग -

अटल सेतू आता शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने सोलापूर आणि साताऱ्याला जोडण्यात येणार आहे. म्हणजेच अटल सेतूवरून खाली उतरल्यानंतर १४ पदरी रस्ता तयार केला जाणार आहे. हा महामार्ग थेट बंगळुरू आणि छत्रपती संभाजीनगरला जोडणार आहे. यासोबत हा रस्ता पुणे रिंग रोडशी कनेक्ट केला जाणार आहे. या नव्या महामार्गामुळे सातारा आणि सोलापूरला जाणं देखील सोपं होणार आहे. या नव्या महामार्गासाठी जवळपास १७ हजार कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे.

मुंबई - पुणे प्रवास सुसाट -

महत्वाचे म्हणजे, या नव्या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गामुळे मुंबई ते पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवासाचा कालावधी आणखी कमी होणार आहे. अवघ्या दोन तासांमध्ये तुम्हाला मुंबईवरून पुणे गाठता येणार आहे. मुंबई - पुणे प्रवासासाठी सध्या साडेतीन तासांचा वेळे लागतो. पण या नव्या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गामुळे प्रवासाच्या वेळेमध्ये सव्वा ते दीड तासांची बचत होणार आहे, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातील एका अधिकाऱ्यांने दिली आहे. या नव्या महामार्गामुळे मुंबई आणि पुणेकरांचा प्रवास आणखी सुखकारक आणि सुसाट होणार आहे.

पुण्याला रिंग रोडने जोडणार -

सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, 'नवीन महामार्ग पुण्याला रिंग रोडने जोडला जाईल आणि पुढे बेंगळुरूपर्यंत विस्तारेल. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड रहदारी आहे. अटल सेतूजवळ १४ पदरी रस्ता तयार केला जाईल. जो पुढे पुण्याला रिंग रोडने आणि नंतर बेंगळुरूला जोडला जाईल. या रस्त्यामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ५० टक्क्याने कमी होईल.'

असा असेल नवा महामार्ग -

या महामार्गाद्वारे अटल सेतू आणि जेएनपीटी हे डायरेक्ट पुणे, सातारा, सोलापूरला जोडले जाईल. १३० किलोमीटर लांबीचा हा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग असणार आहे. हा महामार्ग थेट चौक-पुणे-शिवारे जंक्शन असा असणार आहे. या महामार्गावर वेगवान प्रवासासाठी ८ लेन असणार आहेत. या रस्त्याच्या बांधणीसाठी अंदाजे १७,५०० कोटी रुपयांचा खर्च होईल. सध्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून या नव्या महामार्गाची रुपरेषा तयार केली जात आहे. हा महामार्ग तयार झाल्यानंतर त्याचा प्रवाशांना चांगला फायदा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT