RTO चे नवे दरपत्रक अमान्य.. 13 हजार रिक्षा चालक करणार बेमुदत बंद SaamTV
मुंबई/पुणे

RTO चे नवे दरपत्रक अमान्य.. 13 हजार रिक्षा चालक करणार बेमुदत बंद

RTO ने जारी केलेले नवे दर हे आम्हाला परवडण्यासारखे नसल्याची भूमिका अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील रिक्षा संघटनांनी घेतली आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथ : बदलापूर,अंबरनाथ (Badlapur, Ambernath) या दोन शहरातील तब्बल 13 हजार रिक्षा चालक दोन दिवसात बेमुदत बंद करणार आहेत. कल्याण RTO च्या नव्या दर पत्रकांविरोधात दोन्ही शहरातील रिक्षा चालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. अंबरनाथ आणि बदलापूर रिक्षा चालक संघटनांनी आज या आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली.

कल्याण आरटीओने काही दिवसांपूर्वीच शेअर रिक्षांसाठी असलेल्या भाडे दरात मोठी कपात केली होती. याबाबत नवीन दरपत्रक कल्याण आरटीओने जारी केलं होतं. यामध्ये अंबरनाथ आणि बदलापुर शहरांसह डोंबिवली, कल्याण आणि उल्हासनगर शहरातील भाडे दर सुद्धा कमी करण्यात आले होते. या भाडे कपातीचं प्रवाशांनी स्वागत केलं असलं, तरीही रिक्षा संघटनांनी मात्र या भाडे कपातीचा विरोध केला आहे.

कल्याण RTO ने ज्या सर्वेक्षणानुसार ही दर निश्चिती केली, ते सर्वेक्षण 2015 साली झालेलं असून त्यावेळी असलेले गॅसचे दर आणि महागाई ही आज 6 वर्षांनी जवळपास दुप्पट झालेली आहे. त्यामुळे कल्याण आरटीओने जारी केलेले नवे दर हे आम्हाला परवडण्यासारखे नसल्याची भूमिका अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील रिक्षा संघटनांनी घेतली आहे. हे दर निश्चित करताना आम्हाला विश्वासात घेणं गरजेचं असून सध्या जारी करण्यात आलेले दर आम्हाला मान्य नाहीत, असं रिक्षा संघटनांनी म्हटल आहे.

RTO ने जारी केलेले नवीन दर मागे न घेतल्यास येत्या काळात अंबरनाथ आणि बदलापूर शहरात रिक्षांचा बेमुदत संप पुकारण्याचा इशारा रिक्षा संघटनांनी दिला असून यामध्ये दोन्ही शहरातील मिळून जवळपास 13 हजार रिक्षाचालक सहभागी होतील, अशी माहिती रिक्षा संघटनांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रश्नावर आता आरटीओने लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज व्यक्त होतेय.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dark Circle: डोळ्यांखालील डार्क सर्कल घालवायचे तर 'या' घरगुती टिप्स फॅालो करा

Raj Thackeray Speech : राज ठाकरेंची अख्ख्या महाराष्ट्राला साद; एकदा सत्ता हातात देऊन बघा!

Bengaluru Accident: बेंगळुरूच्या रस्त्यावर थरार, आलिशान कारनं तरुणीला उडवले

OYO हॉटेलचा फूल फॉर्म तुम्हाला माहितीये का?

Donald Trump Vs Kamala Harris: अबकी बार ट्रम्प सरकार! डोनाल्ड ट्रम्प ४७ वे अध्यक्ष होणार, रिपब्लिकनने पार केला बहुमताचा आकडा

SCROLL FOR NEXT