Mumbai Poisoning Case Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईत चिकन शोर्मा खाऊन 12 जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

Goregaon News: मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे चिकन शोर्मा खाऊन 12 जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे. गोरेगाव पूर्वेकडील संतोषनगरमध्ये ही घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News:

>> संजय गडदे

मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे चिकन शोर्मा खाऊन 12 जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे. गोरेगाव पूर्वेकडील संतोषनगरमध्ये ही घटना घडली आहे. विषबाधा झालेल्या सर्व जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

एम डब्ल्यू देसाई रुग्णालयात विभागात विषबाधा झालेल्यांवर उपचार सुरू असल्याचं सांगणात येत आहे. यामधील 9 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला आहे. तर तीन जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. स्वप्निल डहाणूकर, मुस्ताक अहमद आणि सुजित जयस्वाल या तिघांची प्रकृती अस्थिर आहे, असं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पूर्वेकडील संतोष नगर येथील गोल्डन बार समोर सॅटॅलाइट टॉवर येथे चिकन शर्मा खाल्ल्यामुळे एकूण बारा जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या सर्व विषबाधा झालेल्या व्यक्तींना गोरेगाव परिसरातील एम डब्ल्यू देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या संदर्भातली माहिती रुग्णालयातील डॉक्टर मिश्रा यांनी पोलिसांना कळवली आहे.

26 एप्रिल या दिवशी दहा जणांना वेजबादा झाल्याचं उघडकीस आलं. यानंतर 27 एप्रिल दिवशी अजून दोन जणांना त्रास जाणू लागल्यामुळे त्यांना देखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार करून यातील नऊ जणांना आता रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून अजूनही तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT