वाढदिवस साजरा करण्यासाठी पतीसोबत दुचाकीवरून निघालेल्या महिलेच्या हातातून ११ महिन्याचं बाळ निसटलं. या घटनेत या घटनेत बाळाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. ही दुर्देवी घटना मुंबईच्या मीरारोड परिसरात शनिवारी (२५ नोव्हेंबर) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दक्ष शहा (वय ११ वर्ष) असं मृत बाळाचं नाव आहे. आईच्या वाढदिवशीच बाळाचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर पश्चिमेच्या (Mumbai News) बबूदा रेसिडेन्सीमध्ये कुणाल शहा आपल्या पत्नी जिन्ना आणि दोन मुलांसह राहतात.
शनिवारी जिग्ना यांचा वाढदिवस असल्याने कुणाल हे आपल्या छोट्याशा परिवारासह गोराई समुद्रकिनार्यावरील एका रिसॉर्टला दुचाकीवरून जाण्यासाठी निघाले होते. कुणाल यांची ५ वर्षांची मुलगी कियरा ही पुढे होती, तर जिग्ना ह्या दक्षला मांडीवर घेऊन मागे बसल्या होत्या.
दरम्यान, राई आणि मोरवा दरम्यान असलेल्या सुरभी हॉटेलजवळ कुणाल यांची दुचाकी आली असता, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे क्षणात दुचाकी घसरली अन् मोठा अनर्थ घडला. तोल गेल्याने जिग्ना यांच्या हातून दक्षचा ताबा सुटला.
अचानक घडलेल्या ह्या घटनेने दक्ष खाली पडला. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी मृत घोषित केलं. याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.