Pune Cyber Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Cyber Crime : ऑनलाईन रिसॉर्ट बुक करत असाल तर सावधान! पुण्यात एका व्यक्तीला १ लाखांचा गंडा

त्यांनी लगेचच पोलिसांकडे धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune Cyber Crime News: सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी जाणवत आहे. अशात डिसेंबर महिन्यात अनेक व्यक्ती महाबळेश्वर, माथेरान सारख्या अनेक हिल स्टेशनवर सुट्टया एन्जॉय करण्याचा प्लॅन करत असतात. तुम्ही देखील असा प्लॅन करत असाल तर जरा सावधान. कारण पुण्यातील एका व्यक्तीनेही बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन केले मात्र सायबर गुन्हेगारांनी (Cyber Crime) त्याला लाखोंचा गंडा घातला. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्या व्यक्तीने पोलीस स्थानकात धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मोरे यांनी सप्टेंबर महिन्यातच बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन केले होते. महाबळेश्वर ( Mahabaleshwar) येथे ते फिरायला येणार होते. त्यामुळे त्यांनी 'द किज एवरशाईन रिसॉर्ट' या रिसॉर्टचे बुकिंग केले. हे बुकिंग डिसेंबरचे होते. रिसॉर्टमध्ये बुकिंग करताना त्यांनी ऑनलाईन पर्याय निवडला आणि एका संकेत स्थळावर भेट दिली. त्यावेळी त्यांना एक संपर्क क्रमांक देत त्यावर संपर्क साधून बुकिंग करण्याचे सांगण्यात आले.

पुढे मोरे यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा त्यांना विविध माहिती विचारून विचारात घेतली गेली. सायबर गुन्हेगारांच्या खोट्या बोलण्यावर मोरेंचा विश्वास बसत गेला. आपल्याबरोबर खूप मोठी फसवणूक होत आहे याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर मोरेंना बुकिंगचे अॅडवान्स पैसे मागितले गेले. त्यांनी त्या क्रमांकावर तब्बल १ लख रुपये पाठवले. मात्र नंतर त्या क्रमांकावरून त्यांना एकही फोन आला नाही.

त्यामुळे त्यांनी महाबळेश्वरला जाऊन "द किज एवरशाईन रिसॉर्ट"ला भेट दिली. तिथे चौकशी केली असता तुमचे कोणतेही बुकिंग नाही आणि हा क्रमांकही आमचा नाही, असे त्यांना सांगण्यात आले. नंतर मोरेंना लक्षात आले की, आपली खूप मोठी फसवणूक झाली. त्यामुळे त्यांनी लगेचच पोलिसांकडे धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्या क्रमांकाचा शोध घेणे सुरू केले असून सदर क्रमांक उत्तरप्रदेशातील असल्याचे समजले आहे. तसेच पोलीस त्या सायबर गुन्हेगाराचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरण; स्मृतीस्थळावर फॉरेन्सिक टीम दाखल|VIDEO

Maharashtra Live News Update: चंद्रपुरातील मनपाच्या मल:निस्सारण संयंत्रात क्लोरीन गॅस गळती

Nellore Accident: आजारी नातेवाईकाला भेटायला जाताना अपघात; भरधाव ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Jewellery Cleaning: दागिने स्वच्छ करण्यासाठी वापरा 'ही' ट्रिक; काही मिनिटांत चमचम करेल सोन्याचा हार

डोळ्यासमोर पीक गेले वाहून; शेतकऱ्याला अश्रू अनावर|VIDEO

SCROLL FOR NEXT