Samantha Ruth Prabhu: सामंथा रूथ प्रभूच्या हाउंडस्टूथ प्रिंट सिल्क साडीने वेधले नेटकऱ्यांचं लक्ष, पाहा ग्लॅमरस फोटो

Shruti Vilas Kadam

आकर्षक साडीत दिसली सामंथा

अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू हिने अत्यंत खास houndstooth print असलेली सिल्क साडी परिधान केली. या साडीमधून पारंपरिक भारतीय आणि पाश्चात्य शैलीचा सुंदर संगम दिसून आला.

Samantha Ruth Prabhu | Saam Tv

हाउंडस्टूथ प्रिंटचे वैशिष्ट्य

हाउंडस्टूथ हा प्रिंट प्रामुख्याने पाश्चात्य फॅशनमध्ये वापरला जातो. मात्र, तो भारतीय सिल्क साडीमध्ये सादर करून सामंथाने आपल्या लूकला आधुनिक आणि हटके स्पर्श दिला.

Samantha Ruth Prabhu | Saam Tv

रंगसंयोजनाने वेधले लक्ष

सोनेरी बॉर्डर असलेली champagne-gold रंगाची साडी अत्यंत एलिगंट दिसत होती. या रंगांमुळे साडीचा लूक अधिक उठावदार झाला.

Samantha Ruth Prabhu | Saam Tv

ब्लाऊजची साधी पण स्टायलिश निवड

सामंथाने या साडीसोबत साधा काळा स्लीव्हलेस ब्लाऊज पेअर केला होता. या मिनिमल ब्लाऊजमुळे संपूर्ण लक्ष साडीच्या डिझाइनकडे गेले.

Samantha Ruth Prabhu | Saam Tv

दागिन्यांनी दिला सांस्कृतिक स्पर्श


लूक पूर्ण करण्यासाठी सामंथाने पारंपरिक दागिने परिधान केले. भव्य झुमके आणि बाजूबांडे यामुळे तिच्या स्टाईलमध्ये भारतीय संस्कृतीची झलक दिसून आली.

Samantha Ruth Prabhu | Saam Tv

मेकअप आणि बिंदी

हलका ब्राऊन स्मोकी आय मेकअप, न्युड लिपस्टिक आणि लाल बिंदीमुळे तिचा लूक अधिक क्लासिक वाटत होता.

Samantha Ruth Prabhu | Saam Tv

फॅशनमध्ये नवीन ट्रेंडची ओळख

सामंथाच्या या साडी लूकचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले. पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा मिलाफ असलेला हा लूक फ्यूजन ट्रेंड म्हणून ओळखला जात आहे.

Samantha Ruth Prabhu | Saam Tv

दररोज गाजर-आल्याचा ज्यूस प्यायल्याने शरीरात होतील 'हे' बदल

Carrot-Ginger Juice Benefits
येथे क्लिक करा