Shruti Vilas Kadam
गाजरातील बीटा-कॅरोटीन आणि आल्यातील अँटीऑक्सिडंट्स शरीराची इम्युनिटी मजबूत करतात. नियमित ज्यूस घेतल्यास सर्दी-खोकला व संसर्गाचा धोका कमी होतो.
आले पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. गाजर-आल्याचा ज्यूस रोज प्यायल्याने गॅस, अपचन, पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.
गाजरातील व्हिटॅमिन A आणि C त्वचेसाठी लाभदायक असतात. हा ज्यूस त्वचेतील टॉक्सिन्स बाहेर काढून नैसर्गिक ग्लो देण्यास मदत करतो.
हा ज्यूस कमी कॅलरीयुक्त असून मेटाबॉलिझम वाढवतो. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते आणि पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते.
गाजर डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सेवन केल्यास दृष्टी सुधारण्यास, डोळ्यांचा थकवा कमी होण्यास मदत होते.
आल्यातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील सूज, सांधेदुखी आणि स्नायूंच्या वेदना कमी करण्यास मदत करतात.
गाजर-आल्याचा ज्यूस रक्ताभिसरण सुधारतो, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो.