बापरे! 1 कोटींचं सोने गेले चोरीला; ऐन दसऱ्याच्या दिवशी घडली घटना Saam Tv
मुंबई/पुणे

बापरे! 1 कोटींचं सोने गेले चोरीला; ऐन दसऱ्याच्या दिवशी घडली घटना

एका कामगाराने ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर 1 कोटी 18 लाख 66 हजार रुपयांची जबरी चोरी केल्यानं पिंपरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गोपाल मोटघरे

पुणे: एका कामगाराने ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर 1 कोटी 18 लाख 66 हजार रुपयांची जबरी चोरी केल्यानं पिंपरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधीत घडलेला प्रकार लक्षात येताच, ज्वेलर्स दुकानाच्या मालकाने त्वरित चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत, आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत. या घटनेचा पुढील तपास चिखली पोलीसांच्या वतीने चालू आहे.

मुकेश सोलंकी असं गुन्हा दाखल झालेल्या 30 वर्षीय कामगाराचं नाव असून तो चिखली परिसरातील मोरेवस्ती येथील रहिवासी आहे. पण तो मुळगाव राजस्थानच्या पाली जिल्ह्यात रहिवासी आहे. आरोपी सोलंकी हा चिखली येथील श्री महावीर ज्वेलर्समध्ये सेल्समन म्हणून काम करत होता. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपीनं दुकानातील तब्बल 1 कोटी 18 लाख 66 हजार रुपयांचा सोनं लंपास केला आहे. याप्रकरणी श्री महावीर ज्वेलर्सचे मालक जितेंद्र अशोक जैन (वय-35, रा. निगडी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भंडाऱ्यात कुकरचा स्फोट झाल्यानं 14 जाण जखमी

Mumbai To Solapur: सोलापूरकरांसाठी खुशखबर! मुंबई-सोलापूर विमानसेवा 'या' तारखेपासून सुरू

Accident : बसचालकाला हृदयविकाराचा झटका, चुकून अ‍ॅक्सिलरेटर दाबला अन् मोठा अनर्थ घडला; Video

एसटीचा प्रवास धोक्याचा! वाहकाची मुजोरी, भंडाऱ्यात महिला एसटी बस वाहकाची प्रवाशाला मारहाण|VIDEO

Ananya Pandey Filmfare Look: बांधणी साडीमध्ये अनन्याचा हॉट लूक, फोटो खुपच सुंदर

SCROLL FOR NEXT