शिवसेना तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील यांची हत्या - Arun Joshi
मुख्य बातम्या

तिवसा येथे शिवसेना शहर प्रमुखाची हत्या

अरुण जोशी

तिवसा : अमरावती नागपूर Amravati Nagpur राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आशिर्वाद वाईन बार समोर अज्ञातांनी शिवसेनेचे Shivsena तिवसा शहरप्रमुख अमोल पाटील यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या Murder केल्याची घटना शनिवारी रात्री 10.30 ला घडली. या घटनेमुळे शहरांत तणावपूर्ण वातावरण पसरले असून कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. Shivsena Tiwsa City Chief Murdered

मिळालेल्या माहितीनुसार अमोल पाटील हे मित्रा सोबत वाईन बार मध्ये आले होते. अमोल पाटील व त्याचा एक मित्र बार जवळ बसले असता या ठिकाणी काही 3 ते 4 अज्ञात आरोपींनी अमोल पाटील यांच्या डोक्यावर सपासप वार करत त्याला जागीच ठार केले. तिवसा पोलीस निरीक्षक रिता उईके घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. त्यानंतर अमोल पाटील यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदन करिता पाठवला आहे.

घटनास्थळी रक्त मोठ्या प्रमाणावर सांडले होते. दरम्यान या घटनेनंतर पुन्हा तिवसा येथे खळबळ उडाली आहे. पोलीस बार मधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासात असून पुढील तपास करीत आहेत. तर आरोपींच्या मागावर पोलीस रवाना झाले आहेत..

हे देखिल पहा

एकाच वर्षातील हत्येची दुसरी घटना

वर्षाभरा आधी याच प्रकारे कडक लॉकडाऊनमध्ये शहरातील अजय दलाल या युवकाची घरात घुसून हत्या करण्यात आली होती. त्यांनतर आज पुन्हा हत्येची पुनरावृत्ती झाल्याने शहरांतील कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Edited By- Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT