मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे; संजय राऊत
मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे; संजय राऊत  Saam Tv news
मुख्य बातम्या

मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे; संजय राऊत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदही कानेकर

बेळगावमध्ये (Belgaum) मराठी माणसाचा पराभव घडवून आणला गेलाय. अनपेक्षित निकाल आहे हा. बेळगाव वर महाराष्ट्राचा (Maharashtra) हक्क राहू नये, यासाठी कर्नाटक (Karnatak) सरकारने समितीचा पराभव घडवून आणला आहे. आता या निकालासाठी जे लोक पेढे वाटत आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे, असा हल्लाबोल शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. बेळगाव महापालिका निवडणूकीच्या निकालावर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हे देखील पहा-

बेळगाव महापालिका निवडणूकीचा (Belgaum Municipal Corporation Election) निकाल लागला. या निकालात भाजपनं बहुमत मिळवत बेळगावात एकहाती सत्ता काबीज केली. त्यानंतर राज्यातील भाजपा नेत्यांनी जल्लोष केला. यावर संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर टिकेचा आसूड ओढला आहे.

''आज महाराष्ट्रात मराठी माणूस हरला म्हणून पेढे वाटले जातायत. ही नादानी आहे. अशी इतकी गद्दारी कुणी केली नव्हती. याचे दुर्देव वाटतंय. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी शेकडो मराठी माणसांनी बलिदानन दिलं. बाळासाहेब तुरुंगात गेले. अन् तुम्ही पेढे वाटता मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत नाही तुम्हाला, अशा शब्दांत त्यांनी भाजपा नेत्यांना खडसावले आहे.

इतकेच नव्हे तर, तिथला भगवा कर्नाटकने उतरवला तेव्हा तुम्ही का गप्प बसता? गोपीनाथ मुंडेही एकीकरण समितीच्या पाठिशी होते. राजकारण नव्हते यात. या पराभवाने महाराष्ट्रात अनेकांना वेदना झाल्या आहेत. सातारा, सांगली कोल्हापुरातून फोन येत आहेत. पण तुम्ही पेढे वाटत आहात. तुमचा पक्ष जिंकला आणि मराठी माणसाच्या एकजुटीचा पराभव झाला. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी गणेशोत्सवानंतर बेळगाव दौरा करणार असल्याचेही सांगितले. तसेच. यावेळी त्यांनी कोथळा बाहेर काढण्याच्या वक्तव्यावरही स्पष्टीकरण दिले. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासंदर्भातकुणाला दु:ख वाटते का ? चंद्रकांत पाटील यांनी विधान केले होते त्यावर मी बोललो. पाठीत खंजीर खुपसणं आमची पद्धत नाही. कधी यायचं पुण्यात सांगा ? मी येतो. असंही त्यांनी नमूद केलं.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT