NCP vs BJP: प्रवीण दरेकर, माफी मागा अन्यथा थोबाड रंगवू: चाकणकरांचा इशारा  
मुख्य बातम्या

NCP vs BJP: प्रवीण दरेकर, माफी मागा अन्यथा थोबाड रंगवू: चाकणकरांचा इशारा

तुमच्या बोलण्यातून जी घाण टपकतेय ती तुमच्या वैचारिकतेची दरिद्रता दाखवून देत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. महिलांची माफी मागा अन्यथा गाल आणि थोबाड दोन्ही रंगवू असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी प्रवीण दरेकर यांना दिला आहे.

हे देखील पहा-

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर येत्या १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. याबाबत काल स्वत त्यांनी जाहीर केले. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादीवर टिका करताना प्रवीण दरेकरांची जीभ घसरली.

काय म्हणाले प्रवीण दरेकर?

पुण्यात आयोजित रामोशी समाजाच्या मेळाव्याला काल प्रवीण दरेकरांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सुरेखा पुणेकरांचं नाव न घेता टीका केली. "या पक्षाला गरीबांकडे पाहण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, अशी घणाघाती टिका प्रवीण दरेकरांनी यावेळी केली.

या मुद्द्यावरुन आता राष्ट्रवादी कॉंग्रेस चांगलाच आक्रमक झाला आहे. रुपाली चाकणकर यांनीदेखील प्रवीम दरेकरांना त्यांच्या महिलांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर माफी मागण्याचा इशारा दिला आहे.

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर

''प्रवीण जी दरेकर आपण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहात, विधान परिषद हे खऱतंर वरिष्ठ, वैचारिक आणि अभ्यासू नेत्यांचे सभागृह आहे. पण आज आपण ज्या पद्धतीने वक्तव्य केले त्यातून आपला त्या वैचारिकतेशी आणि अभ्यासाशी दूरदूर पर्यंत संबंध नाही हेच दिसून येते. आपण बोललात की, 'राष्ट्रवादी हा रंगलेला गालांचा मुका घेणारा पक्ष आहे.' पण तुम्ही महिलांबद्दल सातत्याने असे बोलताय, महिलांना दूय्यम वागणूक देणे ही तुमची आणि तुमच्या पक्षाची परंपरा आहे. तुमच्या बोलण्यातून जी घाण टपकतेय ती तुमच्या वैचारिकतेची दरिद्रता दाखवून देत आहे. तुमच्या पक्षातील काही महिला बाहेर फिरताना आपण महिलांचे किती कैवारी आहोत, हे त्या दाखवून देत आहेत. पण मला त्यांची किव वाटत आहे. त्या अशा पक्षात काम करत आहेत, ज्या पक्षाचा महिलांबाबत असा विचार आहे. पण तुमच्या बोलण्यावरुन तुमच्या पक्षाची संस्कृतीही समजली आहे. त्यामुळे प्रवीणजी दरकेर तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आपले गाल आणि थोबाड दोन्हीही रंगवू शकतो. याची जाणीव ठेवावी.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Sanjay Shirsat : मुख्यमंत्री शिंदेच होणार? संजय शिरसाट यांचा मोठा खुलासा

Gold Price Today: सुवर्णसंधी! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; एक तोळा सोन्याचा भाव काय?

Maharashtra News Live Updates: माजी आमदार नरसय्या आडम यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

Badshah : रॅपर बादशाहच्या क्लबजवळ झाला मोठा स्फोट, हल्लेखोर बाईकवरुन आले अन्...; पुढे काय घडलं?

Constitution Of India: भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये या महिलांनी दिलंय विशेष योगदान; वाचा

SCROLL FOR NEXT