दत्तात्रय भरणे यांनी दिला धनगर समाजाच्या मागणीला पाठिंबा

 

Saam TV

मुख्य बातम्या

दत्तात्रेय भरणे यांनी केले धनगर समाजाच्या 'त्या' इशाऱ्याचे समर्थन

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. राष्ट्रवादीचे मंत्री व सोलापूरचे पालक मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे

भारत नागणे

पंढरपूर : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. एवढेच नाही तर आषाढीच्या शासकीय महापूजेला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पंढरपुरात येऊ देणार नाही, असा धनगर समाजाने इशारा दिला आहे. धनगर समाजाच्या या कृतीचे आज राष्ट्रवादीचे मंत्री व सोलापूरचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी समर्थन करत त्यांच्या या मागणीला पाठींबा दिला आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील धुसफूस समोर आली आहे.

हे देखिल पहा -

मंत्री दत्तात्रय भरणे आज पंढरपुरात आले होते. कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमा नंतर पालक मंत्री भरणे यांनी पत्रकारांशी साधला. यावेळी त्यांनी धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या इशाऱ्याचे त्यांनी समर्थन केले.

धनगर समाज अनेक वर्षापासून आरक्षणाच्या मागणीसाठी लढत आहे. आरक्षणाची मागणी करणे हे गैर नाही. त्यांच्या या मागणीला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचेही भरणे यांनी स्पष्ट केले. भरणे यांच्या सूचक वक्तव्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेने मध्ये असलेली धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT