परभणीत मराठा आरक्षण आंदोलन पेटले 
मुख्य बातम्या

परभणीत मराठा आंदोलन पेटले : रेलरोकोसाठी आलेल्या संभाजी सेनेच्या कार्यकर्त्यांना अटक

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संभाजी सेनेच्यावतीने दोन दिवसापूर्वीच रेलरोको आंदोलनाची हाक दिली होती.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

परभणी ः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. दोन) रेलरोको आंदोलनासाठी जाणाऱ्या संभाजी सेनेच्या पदाधिकाऱ्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी रेल्वेस्थानकाच्या बाहेरच आडवून ताब्यात घेतले. यावेळी संभाजी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ वाद झाल्याने तणाव निर्माण झाला होता.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संभाजी सेनेच्यावतीने दोन दिवसापूर्वीच रेलरोको आंदोलनाची हाक दिली होती. संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. दोन) नांदेड- अमृतसर या सचखंड एक्सप्रेस थांबवून आंदोलन करणार होते. परंतू याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे संपूर्ण रेल्वेस्थानकात सकाळपासूनच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रेल्वेस्थानकाच्या बाहेर ही पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सकाळी १० वाजता नांदेड- अमृतसर सचखंड एक्सप्रेस येणार असल्याने त्यावेळी संभाजी सेनेचे कार्यकर्ते रेल्वेस्थानकाजवळ जमा झाले होते. त्यावेळी सरकार विरोधात मोठ - मोठ्याने घोषणा देण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आंदोलन रोखल्यामुळे संभाजी सेनेचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले होते. त्यामुळे या ठिकाणी काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता.

हेही वाचा - कंधार तहसील कार्यालयात झालेला भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम शासकीय होता. त्यामुळे संबंधित विभागाने तालुक्यातील लोकप्रतिनिधींना तेथे बोलवायला पाहिजे होते. कंधार तालुक्याचा चाळीस टक्के भाग हा मुखेड विधानसभा मतदार संघात आहे.

या आंदोलनातील एकूण १८ कार्यकर्त्याना अटक केली. यात प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर सोळंके, नांदेड जिल्हाध्यक्ष अंगद नेव्हल पाटील, मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन लव्हाळे, शहराध्यक्ष अरुण पवार, जिल्हा संपर्क प्रमुख नारायण देशमुख, मराठवाडा उपाध्यक्ष ओमप्रकाश लड्डा, जिल्हा संघटक विजय जाधव, तालुकाध्यक्ष दौलत शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष हनुमान भारती, गंगाखेड तालुकाध्यक्ष अजय भिसे, तालुकासंपर्क प्रमुख कालिदास जावळे, विद्यार्थी शहराध्यक्ष सोनू पवार, पूर्णा तालुकाध्यक्ष गोविंद मोरे, निलेश भुसारे, विशाल आर्वीकर, महेश जोगदंड, पवन कुरील, हनुमान भालेराव, दिनेश जाधव, विष्णू हिवरकर, अभि कदम आदी सह पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले.

येथे क्लिक करा - अवैध देशी दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडून साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आखाडा बाळापूर पोलिसांनी बोल्डा पाटीजवळ केली.

अजून आक्रमक आंदोलन करणार

आज आमचा आवाज दाबण्यासाठी पोलिस प्रशासनाने बळाचा वापर करुन आमचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू मराठा आरक्षणासाठी आम्ही संभाजी सेनेच्यावतीने अजूनही जोरदार व आक्रमक आंदोलन करणार आहोत. याची प्रशासनाने दखल घ्यावी.

- रामेश्वर शिंदे, प्रदेशाध्यक्ष, संभाजी सेना

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकार सोने खरेदीचे नियम बदलणार; ग्राहकांच्या संरक्षणासाठी आणणार नवा प्लॅन

Maharashtra Live News Update : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या 40 फूट उंच होर्डिंग चे लोकार्पण

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ६५६५ पदांसाठी होणार भरती; रेल्वे मंत्रालयाने दिली मंजुरी

हृदयद्रावक! दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT