kirit somaiya 
मुख्य बातम्या

दर्शनानंतर किरीट साेमय्या म्हणाले, अंबाबाईस मी 'हे' मागितले

संभाजी थोरात

काेल्हापूर : महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करण्याची क्रांती आजपासून सुरु झाली आहे असे भाजप नेते किरीट साेमय्या यांनी येथील अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बाेलतना स्पष्ट केले. दरम्यान साेमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यावरही टीका केली. kirit-somaiya-latest-news-kolhapur-ambamata-mandir-darshan-sml80

साेमय्या म्हणाले अंबेबाईकडे मी प्रार्थना केली आहे. शक्तीची मातेने त्यावेळेस त्या राक्षसाचा वध केला हाेता. आत्ताच्या वेळेस भ्रष्टाचारा रुपी राक्षसाचा वध करण्यासाठी मला थाेडी ताकद दे. एकाबाजूला राज्यातील साडे बारा काेटी लाेक रस्त्यावर येऊन आम्हांला निराेप देतात आमच्यासाठी प्रार्थना करतात. दूसरीकडे हे राज्य सरकार आम्हांला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करण्याची क्रांती सुरु झाली आहे.

अंबेमाईची कृपाच

ज्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला त्या भावना गवळी आणि सईद खानचे कटकारस्थान अंबेमाईची कृपेने उघडकीस आले आहे. भावना गवळी यांच्या सहकारी सईद खान ज्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला हाेता. मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला ताे सईद खान जेलमध्ये गेला.

ते रुग्णालयात जातात

अनिल परबनंतर काेणता मंत्री ईडी समाेर जाईल असे तुम्हांला वाटते. यावर साेमय्या म्हणाले प्राॅब्लेम हाेताेय ते रुग्णालयात जातात. हसनभाऊ रुग्णालयात दाखल झाले, आनंद अडसूळांना अटक झाली. माझे काम आहे महाराष्ट्राच्या जनतेला लुटणा-यांवर लक्ष ठेवणे. त्यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्न करणे.

याचिकेत दम आहे

आज काेल्हापूरात मी इथून लाेकायुक्तमध्ये सुनावणीस हजर राहिलाे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिल्डर सहका-यास जमीन दिली. त्या घाेटाळ्याची सुनावणी आज सुरु झाली आहे. त्या रुग्णालयास जमीन देऊन देणार नाहीच. लाेकआयुक्तांनी मान्य केले. याचिकेत दम आहे. महापालिका आणि महाराष्ट्र सरकारला आदेश दिले आहेत. त्यांचे उत्तर मागितली आहे.

डाकू लाेक यंत्रणेचा वापर करतात

साेमय्या म्हणाले यंत्रणाचा गैरवापर हाेत आहे हे एकदम खरं आहे. हे डाकू लाेक यंत्रणेचा वापर करुन कशी लूटमार करताता याचा पूरावा मी देईन. सूडाचे राजकारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे करीत असल्याचा गंभीर आराेप साेमय्या यांनी केला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Maharashtra News Live Update: पुण्यात ३५ हजार महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT