हिंगोली, वसमतमध्ये जमीन हादरली भूकंपाची शक्यता
हिंगोली, वसमतमध्ये जमीन हादरली भूकंपाची शक्यता - Saam Tv
मुख्य बातम्या

हिंगोली, वसमतमध्ये जमीन हादरली, भूकंपाची शक्यता

साम टिव्ही

हिंगोली : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात हिंगोली, वसमत, औंढा, व कळमनुरी तालुक्यातील अनेक गावात आजता सकाळी साडेआठ वाजता जमीन (Land) हादरली तर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे याच वेळात एकापाठोपाठ एक असे दोन आवाज (Sound) झाले. यामुळे नागरिक भयभीत झाले. Earthquake likely occurred in Hingoli District

दरम्यान, वसमत तालुक्यात जिल्हाभरात आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के जाणवले. वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये हे धक्के जाणवले. गुंज ,पांगरा शिंदे ,शिवपुरी टाकळगाव, इंजनगाव, गिरगाव, कुरूंदा, इंजनगाव ,म्हातारगाव, महागाव, बोराळा, डोणवाडा, सुकळी, सेलू , अंबा, कौठा, खुदनापुर, किन्होळा सह वसमत शहरात धक्के जाणवल्याने नागरिक भयभित झाले.

हे देखिल पहा

या आवाजाने व जमीन हादरल्याने कोणतीही हानी झाली नाही. मात्र, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली. सकाळी एकापाठोपाठ एक झालेल्या आवाज व काही ठिकाणी जमीन हादरल्याने शहरासह ग्रामीण भागातील सर्वच गावातील गावकरी रस्त्यावर आले होते. सोशल मिडियावरही लगेच याची चर्चा सुरु झाली. दरम्यान, याची माहिती घेण्याचे काम सुरु असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic News: पुण्यातील वाहतुकीत ४ मे पासून मोठे बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Baramati Lok Sabha: सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस, नेमकं कारण काय?

Maharashtra Politics: फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनीही थोपटले दंड; माढ्याच्या मैदानात आरपारची लढाई

Raigad News: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला; आमदार पुत्रासह २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

SCROLL FOR NEXT