Samruddhi Highway Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: 'अम्मी जा रही हूँ', जोयाचे ते शब्द ठरले शेवटचे

'अम्मी जा रही हूँ', जोयाचे ते शब्द ठरले शेवटचे

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात आतापर्यंत २६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यातच नागपूरमधील जोया शेख हिचाही समावेश आहे.

संपूर्ण घर सांभाळून नोकरी करीत कुंटुंबाचे अर्थचक्र तिच्यावर होते. काल दुपारी जेव्हा पुण्याला इव्हेंटच्या कामासाठी ती घरातून जायला निघाली, तेव्हा निघताना तिने आई हुस्‍नारा बेगम हिला ‘अम्मी जा रही हूँ’ असे म्हटले. मात्र, नियतीने घात केला. मध्यरात्री दीड वाजता ट्रॅव्‍हल्सला झालेल्या अपघातात जोया उर्फ गुडीया जमालुद्दीन शेख हिचा मृत्यू झाला. जाताना तिने म्हटलेले शब्द अखेरचे ठरले.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या ताजबाग येथील निराला सोसायटीजवळ असलेल्या प्यारे खान यांच्या घरी भाड्याने हुस्‍नारा बेगम आपल्या तीन मुलांसह राहतात. त्यात मोठा मुलगा अजहर शेख, जोया उर्फ गुडीया आणि जाकीरुद्दीन या भावाबहिणीचा समावेश आहे. वडिलांचा आठ वर्षांपूर्वी मृत्यू झाला. वडिलांचे छत्र हरपल्याने तिन्ही मुलांचे शिक्षण सुटले. त्यातल्या त्यात जोया ही बारावीपर्यंत शिकली. त्याचा फायदा घेत, तिने इव्हेंट कंपनीत नोकरी सुरू केली.

मोठा भाऊ हा डिशटीव्हीचे काम करीत असून लहान भाऊ टाईल्सच्या ठेकेदारासोबत मजुराचे काम करतो. त्यामुळे घरच्या किराण्यापासून तर आई आणि भावांच्या कपड्यापर्यंतची जबाबदारी तिचीच होती. प्रत्येकवेळी इव्हेंटसाठी ती वेगवेगळ्या ठिकाणी फिरायची. दहा दिवसांपूर्वी ती उत्तरप्रदेशातून इव्हेंटचे काम करून घरी परतली होती. त्यानंतर काल तिला पुण्यात इव्हेंटच्या कामासाठी जायचे होते. त्यासाठी तिने आदल्या दिवशी तयारी केली. शुक्रवारी नमाज अदा करीत, ‘अम्मी जा रही हूँ’ असे म्हणत, तिने दुपारी तीन वाजता दोन्ही भावासह बैद्यनाथ चौक गाठले. तिथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या गाडीचे तिकीट घेत, पुण्याचा प्रवास सुरू केला.

आज सकाळी मोठ्या भावाच्या मुलगा सुलतान याने तिच्याबद्दल माहिती देताच, कुटुबातील सदस्यांना धक्का बसला. त्यातून परिवारात शोककळा पसरली. तिच्या मृत्यूच्या धक्क्याने लहान भावाचा आधार तर मोठ्या भावाची ‘गुडीया’ या जगात नव्हती. (Latest Marathi News)

आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने शेख कुटुंबिय हलाखीचे जीवन जगत होते. दहा दिवसांपूर्वी जोया इव्हेंटवरुन घरी आली. मात्र, तिलाही पैसे मिळाले नसल्याने, घरात २९ तारखेला ईद हा सण साजरा करता आला नाही. ईद मोठा सण असल्याने या सणाच्या निमित्ताने घरातील छोट्यांना ‘ईदी’ देत, शुभेच्छा दिल्या जातात. जोयापेक्षा वयाने लहान असलेला जाकीरुद्दीन तिच्या आठवणी सांगताना गहिवरला होता. बहिण या जगात नाही, हे त्याला कळल्यावर आता ईदी कोण देणार यावेळी ईदी न देताच, जोया निघून गेली, असे म्हणत तो हुंदके देत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT