महाराष्ट्र

Maharashtra Politics : बिल्डर, नेत्यांकडून बाबा सिद्दिकींची हत्या? झिशान सिद्दिकींच्या राजकीय वर्तुळात खळबळ,VIDEO

zishan siddique News : माजी मंत्री बाबा सिद्दिकीच्या हत्येबाबत त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकींनी पोलिसांना धक्कादायक जबाब दिलाय....या जबाबात कोणत्या दहा बिल्डर्स आणि नेत्यांची नावं आहेत? कोण सिद्दिकींच्या जीवावर उठलं होतं यावरचा हा विशेष रिपोर्ट...

Girish Nikam

माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. ही हत्या बिष्णोई गँगने केल्याचा दावा पोलिसांनी तपासादरम्यान केलाय. मुंबई पोलीसांनी काही आरोपींना अटकही केली. मात्र आता बाबा सिद्दिकींचे पुत्र माजी आमदार झिशान सिद्दीकींनी आपल्या जबाबात खळबळजनक दावा केलाय.

झिशान सिद्दिकीने पोलिसांना दिलेल्या जबाबात 10 बिल्डर्स, ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि भाजप नेते मोहित कंबोज यांचं नावं घेतलंय...हत्येच्या दिवशी वडिलांनी लिहिलेल्या डायरीत भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव असल्याचा उल्लेख झिशान सिद्दिकींनी केलाय. हत्याप्रकरणी या सर्व संबंधित बाजूंचा तपास करण्याची मागणी झिशान यांनी केलीय.

झिशानचा पोलिसांना दिलेला जबाब काय आहे पाहूयात...

झिशान सिद्दिकींचे आरोप

-वांद्रेमध्ये विकासकांकडून अन्याय होत असल्यामुळे नागरिक माझ्या संपर्कात

-पृथ्वी चव्हाण, शाहीद बलवा, शिवालीक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोयंका, परवेज लकडावाला, मुंद्रा बिल्डर्स, विजय ठक्कर, ओमकार हे बिल्डर संपर्कात

-भाजप नेते मोहित कंबोज यांचा माझ्या वडीलांशी नियमित संपर्क

-हत्येच्या दिवशी माझ्या वडिलांकडून डायरीत मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख

-माझ्या वडीलांच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅपद्वारे मोहित कंबोज यांच्याशी संपर्क

-कंबोज यांना वांद्रेतील मुंद्रा बिल्डर्सच्या प्रकल्पाबाबत माझ्या वडिलांना भेटायचे होते

दरम्यान बाबा सिद्दीकींची हत्या होण्याआधी त्यांच्याशी काही तास बोलणं झालं मात्र चार्जशीटमध्ये आपलं नाव नसल्याचं स्पष्टीकरण भाजप नेते मोहित कंबोज यांनी दिलंय. तर या प्रकरणात सर्वांची चौकशी करा असं अनिल परबांनी म्हटलंय.

तर दुसरीकडे बाबा सिद्दिकींची हत्या बिष्णोई गँगनेच केली या दाव्यावर मुंबई पोलीस ठाम आहेत. मात्र बिल्डर आणि नेत्यांचा या हत्येशी संबंध आहे का? झिशान सिद्दीकींच्या या आरोपावर मुंबई पोलिस नव्यानं तपास करणार का? हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम

India Travel : भारतातील या ठिकाणी घ्या हाऊसबोट्समध्ये राहण्याचा शानदार अनुभव, जाणून घ्या ठिकाणे

Makar Sankranti: यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरु नयेत? महिलांसाठी खास सुचना...

बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही, भाजप नेत्याच्या वक्तव्याने वाद उफळला

Padded Blouse Designs: बॅकलेस आणि डीप नेक साडीवर उठून दिसतील पॅडेड ब्लाऊज, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

SCROLL FOR NEXT