Accident Saam tv
महाराष्ट्र

Accident: दुचाकीस ट्रकची धडक; जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक ठार; १ गंभीर

विशेष म्हणजे दोघेही शिक्षक हेल्मेट घालून होते.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड

यवतमाळ : आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास (wani-yavatmal) चारगाव गावाजवळील वळणावर अचानक बैल आडवा आल्याने दुचाकी चालकाने ब्रेक मारल्याने पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात (accident) एक शिक्षक (teacher) ठार झाले असून अन्य गंभीर जखमी झाले आहेत. (wani accident latest marathi news)

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी : वणी येथील प्रगती नगर येथे वास्तव्यास असलेले प्रशांत बुरांडे श्रीकांत उपाध्ये हे कुरई येथील जिल्हा परिषद शाळेत (zilla parishad school) शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सकाळची शाळा असल्याने दाेघे दुचाकीने शाळेत जाण्यासाठी निघाले होते.

प्रशांत दुचाकीच्या मागे बसले होते. चारगाव गावाजवळील वळणावर अचानक बैल आडवा आल्याने उपाध्ये यांनी ब्रेक मारला. त्यादरम्यान पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये प्रशांत बुरांडे हे जागीच ठार झाले तसेच श्रीकांत उपाध्ये हे जखमी (injured) झाले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

SCROLL FOR NEXT