Maharashtra local body elections Saam tV
महाराष्ट्र

Zilla Parishad Elections : जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांवर मोठा निर्णय, पाहा कधी होणार मतदान?

Maharashtra local body elections : महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये अंतिम मतदार यादी आणि डिसेंबर २०२६ किंवा जानेवारी २०२७ मध्ये मतदान होण्याचा अंदाज आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Zilla Parishad Panchayat Samiti election date : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वाट पाहणाऱ्या राजकीय पक्षांसह नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल आता चालू वर्षाऐवजी थेट पुढच्या वर्षी वाजण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे अडचण सर्वोच्च न्यायालयाने 'एसआयआर' (SIR) प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेमुळे राज्य निवडणूक आयोगासमोर मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे 'एसआयआर' प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे.

ऑक्टोबरमध्ये अंतिम मतदार यादी

प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व प्रक्रियेनंतर ऑक्टोबर महिन्यात अंतिम मतदार याद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरच पुढील निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली जाईल. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान डिसेंबर २०२६ किंवा जानेवारी २०२७ मध्येच पार पडेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

२० जिल्हा परिषदा अन् २११ पंचायत समित्या प्रभावित

निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे राज्यातील मुदत संपलेल्या २० जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या २११ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका आता २०२६ च्या अखेरीस किंवा २०२७ च्या सुरुवातीला होतील. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अंतिम तारीख नक्की काय असेल, हे सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या आगामी सुनावणी आणि न्यायालयाच्या अंतिम निकालावरच पूर्णपणे अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT