sambhajiraje chhatrapati saam tv
महाराष्ट्र

Sambhajiraje Chhatrapati: मी जर लिस्ट काढली तर सरकार अडचणीत येईल : खासदार संभाजीराजे छत्रपती

मंत्रालयीन पत्रकार संघाच्या सदस्यांसोबत आज खासदार संभाजीराजे यांनी किल्ले रायगडाची पाहणी केली.

साम न्यूज नेटवर्क

- राजेश भोस्तेकर

रायगड : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चुका हाेत असतील तर त्याची चाैकशी झाली पाहिजे या मताचा मी देखील आहे. मी यापुर्वी सांगितलं आहे किल्ले रायगड (raigad) येथील विकासकामात जर काेणी काय भानगडी केल्या तर खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशारा खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajieraje chhatrapati) यांनी येथे आज दिला. (sambhaijeraje chhatrapati latest marathi news)

मंत्रालयीन पत्रकार संघाच्या सदस्यांसोबत आज खासदार संभाजीराजे (sambhajiraje chhatrapati) यांनी किल्ले रायगडाची (raigad) पहाणी केली. रायगड प्राधिकरणामार्फत केलेल्या बांधकामांबाबत निकृष्ठ दर्जाचा आरोप स्थानिकांकडुन केला जात आहे. या विषयावर बाेलताना राजे म्हणाले चुका होत असतील तर त्याची जरूर चौकशी झाली पाहिजे. परंतु ज्यांनी आराेप केलेत त्यांनी १ टक्के कामाकडे लक्ष न देता ९९ टक्के कामाकडे लक्ष दिले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.

राजे म्हणाले शासनाकडून होणाऱ्या निधीची दिरंगाईमुळे येथील काम थांबते. मी जर लिस्ट काढली तर सरकार अडचणीत येईल असे सूचक विधानही त्यांनी केले आहे. मी सर्वांशी मिळून मिसळून राहताे, वागताे, बाेलताे. छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्या किल्ल्याचे जतन, संवर्धनासाठी चालून आलेली संधी आहे. हा वन मॅन अजेंडा नाही हे समजून घ्या. अन्य ठिकाणी काय भानगडी चालल्या असतील परंतु रायगड किल्ल्याबाबत (raigad fort) खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा राजेंनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बनावट फोटो लावून जमिनीचा डेव्हलपमेंट करार, ११ जणांवर गुन्हा दाखल; कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार

Roshani Walia : 'सन ऑफ सरदार २' मध्ये झळकणारी रोशनी वालिया कोण आहे?

Women Travel Tips: परदेशी प्रवास करताना महिलांनी कोणते कपडे घालू नयेत?

Coconut Water : नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? 99% लोकांना माहीत नसेल

Restaurant style sambar masala: घरच्या घरी कसा बनवाल साऊथ इंडियन रेस्टॉरंट स्टाईल सांबार मसाला

SCROLL FOR NEXT