Kolhapur Accident News Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Accident News : महावीर काॅलेजसमाेर GST अधिक-याच्या कारचा भीषण अपघात, युवक ठार

अपघातस्थळी झाला त्यावेळी या संपूर्ण परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur Accident News : कोल्हापूर शहरातील महावीर महाविद्यालय परिसरात बुधवारी कारमुळे झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे. या अपघाताची कसून तपास पाेलीस करीत आहेत. (Maharashtra News)

घटनास्थळावरुन आणि (kolhapur) पाेलीसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार हा अपघात रात्री साडे दहाच्या सुमारास घडला. कसबा बावडा मार्गावरून एक कार भरधाव वेगाने कोल्हापूरच्या दिशेने येत होती.

या कारच्या चालकाने भरधाव वेगाने महावीर महाविद्यालय मार्गावर कार घातली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या दोन कारला जोरदार धडक दिली. तसेच त्याच परिसरातील इतर तीन दुचाकी वाहनांना देखील जोरदार धडक बसली.

या धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त वाहन हे जीसएटी विभागातील अधिकाऱ्यांचे असल्याचे समजते. अपघातग्रस्त वाहन चालवणारा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला. हा अपघात होताच स्थानिक नागरिकांनी अपघातातील जखमींना छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.

दरम्यान अपघातग्रस्त (accident) वाहन चालवणा-या ड्रायव्हरने मद्य प्राशन केले होते का ? या अपघाताचे नेमकं कारण काय ? याचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Maharashtra News Live Update: राज ठाकरे एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेणार

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चाणक्यांच्या 'या' 7 गोष्टी कधीही विसरू नका

SCROLL FOR NEXT