Suicide Saam tv
महाराष्ट्र

'तेरे बिन नहीं जीना...' चिठ्ठीत लिहून पंढरपूरातील युवकाची पैठणला आत्महत्या

निखिलने इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले असून तो पैठण एमआयडीसी येथील एका कंपनीत नोकरी करत होता.

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूर (pandharpur) येथील एका इंजिनिअर तरुणाने (youth) पैठण (paithan) येथे आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निखिल दत्तात्रय चांडोले (वय २४) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रेम प्रकरणातून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (pandharpur latest marathi news)

पंढरपूर येथील निवृत्त नायब तहसीलदार दत्तात्रय चांडोले (रा. विजापूर गल्ली ) यांचा निखिल हा एकुलता एक मुलगा होता. पोलिसांना (police) सापडलेल्या चिठ्ठी मध्ये त्याने ”तेरे बिन नहीं जीना मर जाना ढोलना ” असे हिंदी चित्रपटातील गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत.

निखिल हा पैठण येथे शिक्षण आणि नोकरी करीत होता. रविवारी दिवसपाळी करून तो रूम वर आला होता. मध्यरात्री त्याने रूम मधील पंख्याला गळफास घेतला. सकाळी त्याचा मित्र रूम वर आल्यानंतर ही घटना समजली. निखिलने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. निखिलने इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले असून तो पैठण एमआयडीसी येथील एका कंपनीत नोकरी करत होता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT