youth drowns in veravali waterfall near ratnagiri Saam Tv
महाराष्ट्र

रत्नागिरी : वेरवली धबधबानजीक दुर्देवी घटना, युवकाचा मृत्यू, कळसवली गावावर शाेककळा

youth drowns in veravali waterfall near ratnagiri: प्रथमेशला वैद्यकीय अधिका-यांनी तपासले. त्याला वैद्यकीय अधिका-यांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे कळसवली येथे शाेककळा पसरली.

अमोल कलये

रत्नागिरी जिल्ह्यात धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समाेर आली आहे. ही घटना लांजा तालुक्यात घडली आहे. वेरवली बेर्डेवाडी येथील धबधब्यामध्ये ही घटना घडली आहे. प्रथमेश तळेकर (वय 26) असे मृत युवकाचे नाव असल्याची माहिती पाेलिसांकडून मिळाली.

प्रथमेश तळेकर हा युवक राजापूर येथील कळसवलीचा रहिवासी हाेत. रविवारी दुपारी प्रथमेश आपल्या मित्रांसोबत वेरवली बेर्डेवाडी धबधबा येथे गेला होता. तेथे प्रथमेश पोहत असताना अचानक ताे बुडाला.

यामुळे एकच गाेंधळ उडाला. काहींनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. त्याला तातडीने उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला वैद्यकीय अधिका-यांनी तपासले. वैद्यकीय अधिका-यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कळसवली येथे शाेककळा पसरली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT