kalote dam, raigad, pune, youth saam tv
महाराष्ट्र

पुण्यातील मित्राचा वाढदिवस साजरा करताना घडले अघटित; धरणात बुडून कर्नाटकातील युवक मृत्यूमुखी

रविवारी कालाेते धरणात घडली घटना

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

रायगड (raigad latest news) : खालापुरमधील (khalapur) कालोते (kalote dam) धरणात (dam) डुंबण्याचा आनंद लुटत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने एक युवक (youth) रविवारी बुडाला हाेता. त्याचा मृतदेह आज (साेमवार) हाती लागला आहे. आकाश नाईक असे संबंधित युवकाचे नाव असून तो मूळचा कर्नाटक (karnataka) येथील रहिवासी होता. (khalapur latest marathi news)

या घटनेबाबतची अधिक माहिती अशी रविवारी पुण्यातील (pune) युवक पावसाळी पर्यटन आणि मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रायगड (raigad) जिल्ह्यातील खालापुरमध्ये आले होते. खालापुरमधील कालोते धरणात ते डुंबण्यासाठी उतरले. पाण्यात पाेहण्याचा आनंद लुटत असताना विपरीत घडले.

या युवकांमधील आकाश नाईक हा युवक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. त्यानंतर युवकांनी त्याची शाेधा शाेध सुरु केली. परंतु ताे सापडला नाही. स्थानिकांनी या घटनेची माहिती खालापूर पोलिसांना (khalapur police) यांना कळवली. पाेलीसांनी स्थानिकांच्या मदतीने शोध कार्य सुरु केले. परंतु अंधार झाल्याने शोध कार्य थांबवले लागले. आज (साेमवार) सकाळी हि शोध मोहिम पुन्हा सुरु करण्यात आली. आजच्या शोध कार्य माेहिमेत पथकास आकाश याचा मृतदेह सापडला. आकाशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT