Electricity Shock saam tv
महाराष्ट्र

Electricity Shock: विद्युत फिडर बंद करताना तरुणाची चूक, ११ हजार वोल्ट वायरला लटकला अन् जीव गेला

Electric Feeder Accident: दक्षिण सोलापुर तालुक्यातील मुस्ती-संगदरी शिवारात विद्युत पुरवठा बंद करताना महावितरण कर्मचाऱ्याची चूक झाली, ज्यामुळे ११ हजार वोल्ट वीजेच्या धक्क्याने मुस्ती गावाच्या तरुणाचा मृत्यू झाला.

Dhanshri Shintre

विश्वभूषण लिमये/साम टीव्ही न्यूज

दक्षिण सोलापुर तालुक्यातील मुस्ती-संगदरी शिवारात गावचा विद्युत पुरवठा बंद असल्याने पोलवर चढून विद्युत फिडर बंद करताना महावितरण कर्मचाऱ्याची चूक झाली अन् डीपीवर चढलेल्या मुस्ती गावाच्या तरुणाचा ११ हजार वोल्ट विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला आहे. ३५ फूटावर त्या तरुणाचा मृतदेह लोबंकाळत राहिला. कुमार तानाजी घाटगे असे मृत तरुणाचे नाव आहे.

संगदरी-मुस्ती गावांना विजपुरवठा करण्यासाठी दोन डीपी (ट्रान्सफार्मर ) आहेत. यातील मुस्ती गावाचे काही फीडर संगदरी गावाच्या डीपीवर घेतले होते. ही बाब महावितरण कर्मचाऱ्याच्या लक्षात आली नाही. त्याने मुस्ती गावाची लाईट बंद केली आणि संगदरी गावाच्या डीपीवर या तरुणाला चढविले आणि परिणामी या तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाला.

कुमार घाटगे हा अविवाहित होता. तिघे भाऊ असलेल्या कुटुंबातील कुमार हा सर्वात लहान भाऊ होता. त्याला महावितरणाच्या कामाचा काहीसा अनुभव होता. आपल्या गावाची लाईट कशी काय गेली, गावच्या डीपीत काय बिघाड झाला आहे हे पाहण्यासाठी तो डीपीवर चढला आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

डीपीवर चढल्यावर विजेचा शॉक लागून मृत्यू होऊ शकतो, याची माहिती असताना देखील महावितरणाचा कर्मचारी जमादार याने कुमार घाटगेला डीपीवर चढविले यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी लाईनमन जमादार याच्यावर वळसंग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT