Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Latur Crime News : बस चालक, वाहकास बेदम मारहाण, युवकांचा Video Viral

बस चालक आणि वाहकास मारहाण नेमकी कुठल्या कारणामुळे झाली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. या मारहाणीमुळे गावात तणावाचे वातावरण हाेते.

Siddharth Latkar

- संदीप भाेसले

Latur News :

लातूर जिल्ह्यात आज (बुधवार) सकाळच्या सुमारास शहर बस सेवेच्या चालकास आणि वाहकास लाठी काठीने बेदम मारहाण केल्याची घटना समाेर आली आहे. काही युवक चालक आणि वाहकास मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल हाेऊ लागला आहे. (Maharashtra News)

लातूरच्या गंगापूर गावात शहर बस सेेवेच्या चालकास आणि वाहकास काही तरुणांनी लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दाेघांना मारहाण हाेत असताना काही नागरिकांनी तरुणांना थांबविण्याचा प्रयत्न केला.

या मारहाणीत चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले आहेत. बस चालक आणि वाहकास मारहाण नेमकी कुठल्या कारणामुळे झाली ते मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान गावात लाठ्या-काठ्यांनी बस चालक आणि वाहकास फ्रीस्टाइल मारहाण झाल्याने गंगापूर येथे काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी

ओट्स की दालिया? वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला काय खावे?

Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार, एकाच कुटुंबातील तिघांसह ६ जणांचा मृत्यू

Terror Attack : जम्मू- काश्मीरमध्ये मोठा दहशवादी हल्ला, नाव विचारून गोळ्या झाडल्या; 2 जणांचा मृत्यू

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अवघ्या वर्षभरातच गाशा गुंडाळला, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT