Chhatrapati Sambhajinagar Saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! भररस्त्यात टोळक्याकडून जोडप्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ आला समोर

Youth beat couple : छत्रपती संभाजीनगरमध्ये भररस्त्यात टोळक्याकडून जोडप्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. टोळक्याकडून जोडप्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vishal Gangurde

रामनाथ ढाकणे, साम टीव्ही प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर :

छत्रपती संभाजीनगर शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील दिल्ली गेट परिसरातील शासकीय विश्रामगृहासमोर काही टवाळखोर टोळक्याने एका जोडप्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीच्या घटनेमुळे दिल्ली गेट परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या टोळक्याने या जोडप्याला का मारहाण केली, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

टोळक्याने जोडप्याने मारहाण केली. त्यानंतर टवाळखोर तरुणांनी घटनास्थळावरून धूम ठोकत पोबारा केला. टोळक्याने ज्या व्यक्तीला मारहाण केली, तोही व्यक्ती घटनास्थळावरून पसार झाला. हे जोडपे भिन्न समाजाचे असल्याचे बोलले जात आहे. मारहाणीच्या घटनेनंतर घटनास्थळी काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

या मारहाणीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनास्थळावर पोलिसांचा मोठा फौडफाटा पोहोचला. पोलिसांनी घटनास्थळावरील जमावाला पांगवलं. मात्र, पोलिसांनी यायच्या आधीच टोळक्याने धूम ठोकली.

या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून आता या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

शासकीय विश्रामगृहाबाहेर मोठ्या संख्येने तरुण दिसत आहेत. या तरुणांकडून जोडप्याला मारहाण केली जात आहे. एका तरुणाला टोळक्याकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जात आहे. या मारहाणीत तरुण रस्त्यावर पडताना दिसत आहे. टोळक्याकडून तरुणाला माफी देखील मागायला सांगितली जात आहे, असं दिसत आहे. मारहाणीच्या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: संजय दत्त लवकरच या ५ चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ

Maharashtra Politics: फडणवीसांच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार; कुणाला डच्चू, कुणाला संधी?VIDEO

Chapati Nachos : चपातीपासून घरीच करा कुरकुरीत नाचोस, नाश्त्यासाठी ५ मिनिटांत बनवा रेसिपी

Maharashtra Tourism: महाराष्ट्रातील स्वित्झर्लंड! शांत वातावरण अन् सुंदर निसर्ग,'या' ठिकाणी एकदा तरी भेट द्याच

Maharashtra Live News Update: - रायगडमधली परिस्थिती सामान्य झाली आहे

SCROLL FOR NEXT