Young woman sexually assaulted by police sub-inspector for The lure of marriage Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Crime: लग्नाचं आमिष देत पोलिसाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार; २४ वर्षीय तरुणी झाली गर्भवती

Nagpur Crime News: पोलिस उपनिरीक्षक अक्षय ठाकरे यांनी तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर: नागपूरात लग्नाचे आमिष दाखवून २४ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध (Trainee Police Sub-Inspector) कपिलनगर पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. अक्षय ठाकरे (Akshay Thackeray) असे या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून, ते हुडकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये तैनात आहेत. पीडित तरुणी कपिलनगर परिसरात राहात असून, एका कंपनीत व्यवस्थापक आहे. (Young woman sexually assaulted by police sub-inspector for The lure of marriage a 24 year old girl became pregnant)

हे देखील पहा -

आठ महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर (Instagram) तिची अक्षय यांच्यासोबत ओळख झाली. दोघांचे बोलणे सुरू झाले. पोलिस उपनिरीक्षक अक्षय ठाकरे यांनी तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष (The lure of marriage) दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केला. पीडित तरुणी गर्भवती (Pregnant) झाली त्यामुळे तिने अक्षय ठाकरे यांना लग्नाची गळ घातली. अक्षय ठाकरे यांनी तिला लग्नास नकार दिला, तेव्हा तरुणीने कपिलनगर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी त्यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

SCROLL FOR NEXT