Nashik NEws Saam TV
महाराष्ट्र

Nashik News: हेडफोनने घेतला तरुणीचा जीव, नाशिकमधील घटनेने परिसरात हळहळ

रेल्वे फाटकाजवळ कानात हेडफोन असल्याने मागून येत असलेल्या रेल्वेचा तिला आवाजच ऐकू आला नाही.

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : टेक्नोलॉजीमुळे मानवाचं जीनव काहीसं सोपं झालं आहे. अनेक गॅजेटमुळे आपली कामं सोपी होतात, मनोरंजन होतं. मात्र माणसांकडून टेक्नोलॉजीच्या चुकीच्या वापरामुळे दुष्परिणामही भोगावे लागत आहे. अशीच एक घटना नाशिकच्या इगतपुरीतून समोर आली आहे. हेडफोन लावून रस्ताने जाणाऱ्या तरुणीचा अपघातात मृत्यू झाला आहे.

प्रियांक असं मृत मुलीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका कॉलेजमधून हेडफोन लावून मोबाईलवर बोलत घरी निघाली होती. जानोरी येथील रेल्वे फाटकाजवळ कानात हेडफोन असल्याने मागून येत असलेल्या रेल्वेचा तिला आवाजच ऐकू आला नाही. यामुळे ट्रेनच्या धडकेत प्रियांकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

पहिली गोष्ट म्हणजे रेल्वे फाटक ओलांडताना दोन्ही बाजूने ट्रेन येत आहे की नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे. मात्र कानत हेडफोन लावल्याने आणि फोनवर बोलत असल्याने ट्रेनबाबत तिचा अंदाज चुकला.

हेडफोन लावून गाडी चालवू नये किंवा रस्त्याने चालताना कानात हेडफोन लावू नये असे वारंवार सांगितलं जातं. यामुळे याआधीही अनेक अपघात झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र तरीही लोक याकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच असे अपघात होतात. त्यामुळे हेडफोन वापराबाबत काही नियम स्वत:ला घालून घेण्याची सध्या गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT