Wardha Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : 'ऑनलाईन टास्क' ला युवती भुलली, ४ लाख ६७ हजार गमावले

पाेलीसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला आहे.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha Crime News : प्रवाशांचे हॉटेल आणि फ्लाईटचे तिकीट बुक करण्याचे टास्क देऊन पैशाचे आमिष दाखवत युवतीला ४.६७ लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी वर्धा सायबर पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Maharashtra News)

या प्रकरणी वर्धा (wardha) पोलीस दलाने अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबतची माहिती अशी - युवतीला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सऍप मेसेज आला. तिला पार्ट टाईम जॉबची ऑफर दिली गेली.

जॉब मिळविण्यासाठी तुम्हांला युट्यूबवरील व्हिडीओ लाईक शेअर करावे लागेल, अशी अट सायबर ठगांनी ठेवली. युवतीने अधिक माहिती विचारली असता, त्यांनी विविध लिंकवर प्रवाशांचे हॉटेल व फ़्लाईटच्या तिकिटांचे बुकिंग करून टास्क पूर्ण केल्यास जादा रक्कम मिळेल, असे आमिष दाखविले.

दरम्यान, युवतीने १४ विविध लिंकवरून ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याच्या नादात तब्बल ४ लाख ६७ हजार १७८ रुपये गमावले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलीसांत तक्रार नाेंदवली. त्यानूसार पाेलीसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनचालकांनो लक्ष द्या! ठाणे-बेलापूर रोडवर ४ रात्र वाहतूक बंद; काय आहे कारण, पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Weight Loss : आठवड्याभरात बारीक व्हायचंय? रोज फक्त २० मिनिटं करा 'हे' काम, वजनात दिसेल फरक

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT