accident cctv footage video x
महाराष्ट्र

Accident : भीषण! ट्रकखाली चिरडून तरुण इंजिनिअरचा जागीच मृत्यू, घटनेचा CCTV व्हायरल

Bhiwandi Accident : भिवंडीमध्ये भीषण दुर्घटना घडली. भिवंडीतील निंबवली नाका परिसरात ट्रकखाली चिरडून एका तरुण इंजिनिअरचा मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

Yash Shirke

  • भिवंडीमधील निंबवली नाका परिसरात भीषण अपघात

  • ट्रकखाली चिरडून तरुण इंजिनिअरचा मृत्यू

  • अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल

फय्याज शेख, साम टीव्ही, प्रतिनिधी

Accident News : भिवंडीमधून एक दु:खद घटना घडली. कामाहून घरी परतताना एका तरुण इंजिनिअरच्या दुचाकीला ट्रकने जोरात धडक मारली. अपघातामध्ये इंजिनिअरचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ही घटना भिवंडीतील चाविंद्रा-वडपे मार्गावर घडली आहे. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीमधील चाविंद्रा-वडपे मार्गावर भीषण अपघात झाला. हा अपघात निंबवली नाका परिसरात झालेल्या अपघातामध्ये तरुण इंजिनिअरचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख विनोद पाटील (वय २९ वर्षे, रा. कशेळी) अशी झाली आहे. तो वाशिंद येथील एका खासगी कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत होता.

नेहमीप्रमाणे काम संपवून विनोद घरी जाण्यासाठी निघाला होता. रस्त्यात ट्रक आणि त्याच्या दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली. धडकेमध्ये विनोद पाटील ट्रकखाली चिरडला जाऊन जागीच ठार झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे. सविस्तर सीसीटीव्ही व्हिडीओच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.

अपघाताच्या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी अपघाताची माहिती दिली. संपर्क केल्यानंतर भिवंडी तालुका पोलीस देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत इंजिनिअरचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवला. या अपघाताचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT