Kolhapur News  Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur News : तरुण डॉक्टरने क्लिनिकमध्येच संपवलं जीवन; घटनास्थळी चिठ्ठीही सापडली

Kolhapur News : डॉ. महेश रामचंद्र तेलवेकर असं मृत डॉक्टरचं नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर

कोल्हापूर : कोल्हापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुण डॉक्टरने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगूडमध्ये ही घटना घडली आहे. डॉ. महेश रामचंद्र तेलवेकर असं मृत डॉक्टरचं नाव आहे.

डॉ. महेश यांनी आपल्याच दवाखान्यात आत्महत्या केली आहे. काल रात्री हा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान डॉक्टर महेश रामचंद्र तेलवेकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट देखील लिहिली आहे, ती देखील घटनास्थळी आढळून आली आहे.

माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये, असा उल्लेख त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे. मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही. मी चांगला बाप होऊ शकलो नाही. मी कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही. मी काही कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले आहेत. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरु नये, असा मजकूर सुसाईड नोटमध्ये लिहिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगड जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची आज निवड

High Blood Pressure Food: हेल्दी समजून खाताय? पण 'या' ५ पदार्थांमुळे नकळत वाढतोय तुमचा ब्लड प्रेशर; आजच व्हा सावध

सर्वसामान्यांना पुन्हा झटका; घरगुती गॅस सिलिंडर काही दिवसातच संपणार, केंद्राने घेतला मोठा निर्णय, VIDEO

Accident: एअरपोर्टवर मोठी दुर्घटना, फायर ब्रिगेडच्या वाहनाला विमानाची धडक; पाहा थरारक VIDEO

SIDBI Recruitment: खुशखबर! SIDBI मध्ये सरकारी नोकरी करण्याची संधी; या पदांसाठी भरती जाहीर; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT