Beed News
Beed News विनोद जिरे
महाराष्ट्र

"I MISS YOU, MY LOVE" व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

विनोद जिरे

बीड - जिल्ह्यात होळी आणि धुलीवंदनाचा जल्लोष सुरू असतांना, एका युवकाने व्हॉट्सॲपवर 'I miss you, my love, miss you friend, my jigri, Sorry' असे स्टेटस ठेऊन गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही खळबळजनक घटना, बीडच्या आगरनांदूर येथे उघडकीस आली आहे. नितीन चिमाजी निर्मळ वय 23 असे मृत युवकाचे नाव आहे.

हे देखील पहा -

गेवराई तालुक्यातील आंगरनांदुर येथील नितीन निर्मळ हा धुलीवंदनाच्या दिवशी गावात होता. गावात सर्वजण रंग खेळत जल्लोष करत असताना नितीन याने व्हॉट्सॲपवर 'I miss you, my love,miss you friend, my jigri, Sorry, शेवट' असे स्टेटस ठेवले. त्याच्या मित्रांनी, नातेवाईकांनी स्टेट्स पाहताच त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्याचा शोध घेतला मात्र त्याचा शोध लागला नाही. यादरम्यान गावापरिसरातील एका लिंबाच्या झाडाला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

दरम्यान नितीन याने नेमकी आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. दरम्यान याप्रकरणी गेवराई पोलीस पुढील तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai University: मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना मिळणार मंदिर व्यवस्थापनाचे धडे, अभ्यासक्रमात कोणते विषय असणार?

Today's Marathi News Live : नाशिक परिसरात ७ ते ८ दुचाकी तिघांनी पेटवल्या

Modi Rally Ghatkopar News | मुंबईकरांचा संताप अनावर, स्वतःच काढला मार्ग

Gold Silver Rate Today: सोन्याला पुन्हा सोन्याचे दिवस आले; प्रतितोळा भाव किती? खरेदीला जाण्याआधी नवे दर पाहा!

Nanded News |नांदेडमध्ये भंडाऱ्याच्या आंबीलमधून विषबाधा, 55 जण रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT