Wardha Court Saam TV
महाराष्ट्र

काल महिला वकिलावर चाकू हल्ला अन् आज पुन्हा युवकाकडे सापडले शस्त्र...

वर्ध्याच्या न्यायालय परिसरात नेहमीप्रमाणे आज कामकाज सुरू झाले.

सुरेंद्र रामटेके

वर्धा: वर्ध्याच्या न्यायालय (Wardha Court) परिसरात महिला वकीलावर चाकू हल्ला झाल्याची घटना काल घडली होती. या घटनेनंतर न्यायालय परिसरात कडेकोट सुरक्षा वाढविण्यात आली आहे. न्यायालयाच्या दारावरच मेटल डिटेक्टर लावण्यात आले आणि पोलीस देखील तैनात करण्यात आले होते. यावेळी न्यायालयात येणाऱ्या प्रत्येकाची मेटल डिटेक्टरने तपासणी केली जात असतानाच एकाच्या खिशात धारदार चाकू आढळून आला आहे. चाकू सापडल्याने पुन्हा कोर्ट परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

वर्ध्याच्या न्यायालय परिसरात नेहमीप्रमाणे आज कामकाज सुरू झाले. काल मंगळवारच्या चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर सुरक्षा वाढविली. यावेळी प्रत्येकाला तापसणी करून न्यायालयात सोडले जात होते. यात कर्मचारी आणि वकिलांचा देखील समावेश होता. दरम्यान दुपारच्या सुमारास वर्ध्याच्या आनंद नगर येथील दोघे न्यायालयात आले.

एकाने मेटल डिटेक्टर वर तापसणी करून आत प्रवेश केला. पण दुसरा आनंद नगर येथील प्रज्वल पाझारे याने मात्र ही तपासणी करण्यासाठी टाळाटाळ केली. यावेळी त्याने पळ काढताच नियुक्त असलेले पोलीस शिपाई अभिनंदन लाउत्रे यांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी करण्यात आली. त्याच्याकडे खिश्यात धारदार चाकू आढळून आला. पोलिसांनी त्याला शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्याच्यावर हत्यार कायद्यांतर्गत कारवाई केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल

Black Salt Water Benefits: पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! एकाच झटक्यात २ कोटीहून अधिक मतदार यादीतून बाहेर; ३६ जिल्ह्यातील आकडेवारी पाहा

Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT