Yavatmal: हत्येचा थरार; दहा जणांच्या टोळीने केला तरुणाचा खून!
Yavatmal: हत्येचा थरार; दहा जणांच्या टोळीने केला तरुणाचा खून! Saam Tv
महाराष्ट्र

Yavatmal: हत्येचा थरार; दहा जणांच्या टोळीने केला तरुणाचा खून!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ - पुसद Pusad शहर एकदा पुन्हा तरुणाच्या हत्येने हादरले आहे. पुसद उपजिल्हा रुग्णालयाच्या कमानी समोर मंगळवारी रात्री दरम्यान एका युवकाची हत्या Murder करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

मनोज सवंगडे (वय 22 वर्ष) रा. भीमनगर श्रीरामपूर पुसद असे मृत तरूणाचे नाव आहे. शहरातील सरकारी दवाखान्याच्या कमानीजवळील रोडवर तरुणाची हत्या झाली. ही हत्या जुन्या आपसी वादातून झाली असल्याचे बोलले जात आहे.

तरुणाच्या पाठीवर 7 ते 8 शास्त्राने वार करण्यात आले आहेत. तसेच या तरुणाला 10 जणांनी मारलं असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेचा तपास पुसद शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला आणि त्यांची टीम करत असून या घटनेमुळे सर्व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT