Yavatmal News Police
Yavatmal News Police Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! बारावीत ६५ टक्के गुण मिळूनही विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ: यवतमाळमधून (Yavatmal) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल बारावीचा निकाल ऑनलाईन हाती आला. यवतमाळमध्ये सेजल अनिल सालुकर (वय-१८) या विद्यार्थ्यिनीने अपेक्षित गुण न मिळाल्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना वणी येथील लालगुडा परिसरात घडली. तिच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बारावीमध्ये ६५ टक्के गुण मिळूनही तिचा भ्रमनिरास झाला होता. यामुळे ती नैराश्यात गेली होती. नैराश्यात तिने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला ६५ टक्क्यांपेक्षा जास्त गुणांची अपेक्षा होती, पण कमी गुण पडल्याने ती नैराश्यात गेली.

मिळालेल्या माहितीनुसार, सेजल ही बारावीत शिकत होती. तिने बारावीमध्ये जास्त गुण मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. काल निकाल होती आला, यावेळी तिला अपेक्षित गुण मिळाले नाही. यामुळे ती नैराश्यात गेली. आज तिने घरीच गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

काल पुण्यातही एका विद्यार्थ्याची आत्महत्या

पुण्यातील निखिल नाईकचाही आज बारावीचा ऑनलाइन निकाल (Result) होता. या ऑनलाइन निकाल पत्रिकेत त्याला नापास झाल्याचे समजताच मोठा धक्का बसला. त्यामुळे निखिलने इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन उडी मारत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या महितीनुसार, निखिल हा गरवारे महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होता. बारावीचा ऑनलाईन निकाल लागणार हे समजल्यावर निकालाबाबत तो खूपच उत्सुक होता. दुपारी एकच्या सुमारास ऑनलाईन निकाल पत्रिकेत नापास झाल्याचे समजले. त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला. ताण-तणावात त्याने इमारतीच्या वरच्या दिशेने जाऊन वरून उडी मारली. त्यावेळी खाली उभ्या असलेल्या शेखर लहू लोणारे यांच्या अंगावर पडला.यामध्ये लोणारे गंभीर जखमी झाले. तर निखिलचा जागीच मृत्यू झाला. लोणारे यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आई-वडिलांना बसला जबर धक्का

क्रिकेटची आवड असलेल्या निखिलने शरीर सृदृढ ठेवण्यासाठी व्यायाम सुरू केला होता. तो शांत स्वभावाचा होता. निखिलचे वडील आचारीचे काम करतात. तर आई आजूबाजूच्या लोकांच्या घरात जाऊन घरकाम करते. मोठ्या कष्टाने मुलगा निखिलला शिक्षण ते देत होते. मात्र, निखिलच्या जाण्यामुळे त्याच्या आई वडिलांना जबर धक्का बसला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT