YAVATMAL SOYBEAN CRISIS: 21 SEED SAMPLES FOUND SUBSTANDARD, ACTION AGAINST COMPANIES BEGINS Saam Tv
महाराष्ट्र

Yavtmal : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई; १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद

Yavatmal soybean crisis : यवतमाळ जिल्ह्यात कृषी विभागाच्या तपासणीत २१ बियाणे नमुने निकृष्ट आढळले असून संबंधित कंपन्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. निकृष्ट बियाण्यांच्या प्रकरणात आतापर्यंत १० प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन पिकांबाबत ८३२ तक्रारी

  • निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई

  • कृषी विभागाकडून १० प्रकरणांत गुन्हे दाखल

  • दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंदी

महाराष्ट्रावर यंदा अल निनोचे संकट आहे. याचा वातावरणावर मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पेरणीनंतर पीक न आल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जिल्ह्यात सुमारे २ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची शेती करण्यात आली होती. त्यापैकी जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असली, तरी अनेक भागांत पीक समाधानकारक न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाने निकृष्ट बियाण्यांच्या प्रकरणात आतापर्यंत १० कारवाई करण्यात आली आहे.

या संदर्भात कृषी विभागाकडे आतापर्यंत ८३२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रारींची गंभीर दखल घेत विभागाने तपासणी मोहीम सुरू केली असून, त्यापैकी ४८५ तक्रारींची पाहणी पूर्ण करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची स्थिती, बियाण्यांची गुणवत्ता याचा आढावा घेतला जात आहे. तपासणीदरम्यान कृषी विभागाने कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. एकूण ८०४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये २१ नमुने निकृष्ट दर्जाचे आढळले आहेत. यानंतर संबंधित बियाणे उत्पादक आणि विक्री करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

निकृष्ट बियाण्यांच्या प्रकरणात आतापर्यंत १० प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये संबंधित कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, नोटीस कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे पुढील नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.

निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा साठा जप्त करून त्यांची विक्री बंद करण्यात आली आहे. एकूण १ हजार १०८ क्विंटल बियाणे, ज्यांची किंमत दोन कोटी रुपयांहून अधिक आहे, त्यांची विक्री थांबवण्यात आली आहे. त्यामुळे बाजारात अशा बियाण्यांची उपलब्धता कमी होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन तपासणी आणि कारवाई सुरू आहे. दोषी आढळणाऱ्या कंपन्यांविरोधात कायदेशीर पावले उचलली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

SCROLL FOR NEXT