The controversial scholarship exam question in Yavatmal that asked students to identify the “upper caste,” sparking statewide criticism. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Scholarship Exam: उच्च जातीचं नाव काय? शिष्यवृत्तीच्या परिक्षेत जातीचा 'सराव'

Impact Of Caste Based Questions: शिक्षणाच्या मंदिरातच वर्णव्यवस्थेचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातायत... एकीकडे जातीवाद संपवण्याची भाषा केली जात असताना दुसरीकडे जातीवाद शिष्यवृत्तीच्या परिक्षेतून विद्यार्थ्यांमध्ये पेरला जातोय... नेमकं प्रकऱण काय आहे? उच्च जातीचं नाव काय? असा प्रश्न कोणी उपस्थित केलाय..

Suprim Maskar

ही प्रश्नपत्रिका नीट बघा... उच्च जातीचं नाव काय?... असा हा प्रश्न... पुरोगामी महाराष्टातल्या शिष्यवृत्तीच्या परिक्षेत विद्यार्थ्यांना थेट जातच विचारण्यात आली...आता हा प्रश्न पाहून तुम्हाला धक्का बसला असेल... मात्र या प्रश्नानं महाराष्ट्राला लागलेली जातीची कीड अजूनही शाबूत असल्याचं अधोरेखित झालंय. यवतमाळमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं टार्गेट पीक अप्स संस्थेमार्फत घेतलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत हा जातीवाचक प्रश्न विद्यार्थ्यांच्या माथी मारण्यात आलाय.....

संबंधित संस्थेकडून लेखी खुलासा मागवण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलीय...

दुसरीकडे समाजातील वर्णव्यवस्था दाखवणाऱ्या या प्रश्नामुळे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीही संताप व्यक्त केला असून कारवाईची मागणी केलीय.

शिष्यवृत्ती परिक्षा ही मुळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी असते... मात्र याच शिष्यवृत्ती परिक्षेच्या सरावासाठी विद्यार्थ्यांना जातीवाचक प्रश्न विचारले जात असतील.. तर हा प्रश्न नेमका कोणत्या उद्देशाने विचारण्यात आला? याला तांत्रिक चुक म्हणायची की मुद्दामहून जातीयवादाला खतपाणी घालण्याचा कट म्हणायचा असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: राज्यातील १३ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, नवं सरकार येताच बिहारमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल

Tuesday Horoscope : प्रेम, पैसा आणि यश मिळणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरू

धनूभाऊंनी दिली जरांगेंची सुपारी? जरांगेंच्या घातपातासाठी अडीच कोटींची डील?

Maharashtra Live News Update: मीरा-भाईंदरमधील काशिमीरा परिसरात मध्यरात्री तरुणांचा दारू पिऊन धिंगाणा

वाघाचा बाईकस्वारावर हल्ला? शेपटीवरून बाईक नेणं पडलं महागात?

SCROLL FOR NEXT