यवतमाळच्या रँचोची कमाल, बनवली इलेक्ट्रॉनिक बाईक तीही भंगारातल्या सायकलपासून Saam Tv
महाराष्ट्र

यवतमाळच्या रँचोची कमाल, बनवली इलेक्ट्रॉनिक बाईक तीही भंगारातल्या सायकलपासून

पाच रूपयात ५० किलोमीटरचा प्रवास

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ - सध्या महागाईने सर्व सामान्य लोकांचे आर्थिक बजेट Budjet बिघडवले आहेत. अशात पेट्रोल Petrol आणि डिझेलचे Disel भाव तर आकाशाला भिडले आहेत. पेट्रोल व डिझेल दरवाढी वर उपाय म्हणुन भंगारातील सायकल Cycle आणुन एका युवकाने त्या सायकलची इलेक्ट्रॉनिक बाईक Electronic Bike बनविल्याने मोठा चर्चेचा विषय ठरत आहे.

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक जण यशाचा शिखर पार करून गावासह जिल्ह्याचा नाव लौकिक करतात. काही नवीन भन्नाट आयडीया डोक्यात आली तर नविन करण्याची उर्मी माणसाला स्वस्थ बसू देत नाही. नेर तालुक्यातील ब्राह्मणवाडा या गावातील रँचोने भंगारातील सायकल उपयोगात आणून पाच रूपयात ५० किलोमीटरचा प्रवास करत आहे.

हे देखील पहा -

हिमांशू सुनील घावडे, असे या यवतमालमधील रँचोचे नाव आहे. तो पॉलिटेक्निक इलेक्ट्रॉनिक शाखेचा विद्यार्थी आहे. लहानपणापासून जुगाडू काही तरी करण्याची त्याला आवड आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडत असल्याने दुचाकी चालवणे अनेकांना परवडत नाही. त्यामुळे कमी खर्चात प्रवास करता येईल, अशी बाईक बनविण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला आणि त्याने इलेक्ट्रॉनिक बाईक बनविली.

साडेचार तासात बॅटरी चार्ज झाल्यावर पन्नास किलोमीटर पर्यंत चालते. चार्जिंगसाठी केवळ पाच रुपयाचे युनिट जळते. या बाईकचा वापर तो नेर शहरात जाण्यासाठी करतो. तीन क्विंटल वजन ओढण्याची क्षमता या बाइकमध्ये आहे. नवीन सायकल मिळाल्यास यापेक्षा सुधारीत वाहन निर्मिती करण्याचा हिमांशूचा ध्यास आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT