नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहाद, अमरावतीत अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषणानं महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच आता यवतमाळच्या राळेगावमधून धक्कादायक घटना समोर आलीय... गेल्या सहा महिन्यात तब्बल 34 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत आणि या मुलींची वेश्याव्यवसायासाठी मुंबई, पुण्यासोबतच बाहेरच्या राज्यातही विक्री केली जात असल्याचा आरोप भाजपनं केलाय... एवढंच नाही तर या प्रकरणात लव्ह जिहादचा संशय भाजपनं व्यक्त केलाय..
भाजपचे नेते फक्त आरोप करुनच थांबले नाहीत... तर त्यांनी मुलींना कशा पद्धतीनं फसवलं जातं... आणि त्यांची कशी विक्री केली जाते... त्याबाबत रॅकेट कसं सक्रीय आहे... त्याचा कच्चा चिठ्ठाच एका मुलीनं तिच्या प्रियकरासोबत बोलताना उघड केल्याचं सांगत त्यासंदर्भातील कथित कॉल रेकॉर्डिंगही भाजपनं जारी केलीय...
खरं तर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावसह आदिवासी तालुक्यातून पैशांची लालच दाखवून अल्पवयीन मुलींची विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात आला... त्यासंदर्भात आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंनी या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत... त्यानंतर पोलिसांनी माध्यमांसमोर येत वस्तूस्थिती मांडलीय..
खरं तर राज्यात कथित लव्ह जिहादचं हे पहिलंच प्रकरण नाही... राज्यात लव्ह जिहादच्या प्रकरणांची मालिकाच सुरु असल्याचं चित्र आहे.... नाशिकच्या आयटी कंपनीत मुलींचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर केल्याचं समोर आलंय.. तर परतवाडामध्ये अयान अहमद या 19 वर्षीय तरुणानं 8 मुलींचं लैंगिक शोषण करतानाचे 350 पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडीओ आढळून आले आहेत... तर पालघरमध्ये सिकंदर शेख नावाच्या व्यक्तीनं अजय म्हस्के नावानं 29 वर्षीय महिलेचं शोषण केल्याचं समोर आलंय..
राळेगावमधील प्रकरणाचं गांभीर्य पाहता 34 अल्पवयीन मुलींचा शोध घ्यायला हवा.. एवढंच नाही तर मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन त्यांचाही पर्दाफाश करण्याची गरज आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.