Thackeray Joins Eknath Shindes Shiv Sena Saam tv news
महाराष्ट्र

तेजस ठाकरेंचं शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Thackeray Joins Eknath Shindes Shiv Sena: यवतमाळमधील महागाव आणि नेर तालुक्यात पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमात तेजस गोविंद ठाकरे यांनी धनुष्यबाण हाती घेतलं आहे.

Bhagyashree Kamble

  • तेजस गोविंद ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.

  • त्यांच्या प्रवेशामुळे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव आणि नेर भागात चर्चा सुरू आहे.

  • सुरुवातीला भाजप कार्यकर्ता असलेले तेजस ठाकरे आता धनुष्यबाण हाती घेत शिंदे सेनेत दाखल झाले.

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. कुठे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, तर कुठे नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशाच घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतर शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झाली आहे. मात्र, यावेळी विशेष चर्चेत असलेलं नाव म्हणजे तेजस ठाकरे.

शिंदेसेनेत सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे.अशातच नुकतंच पार पडलेल्या पक्षप्रवेशावेळी ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांसह तेजस ठाकरेंनीही पक्षप्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे आणि मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत त्यांनी धनुष्यबाण हाती घेतलं. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

कोण आहेत तेजस ठाकरे?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. दौऱ्याहून परतल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेत भव्य पक्षप्रवेश झाला. यवतमाळच्या नेर आणि महागांव तालुक्यातील ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी तेजस ठाकरेंनीही धनुष्यबाण हाती घेतलं आहे.

तेजस उद्धव ठाकरे नसून तेजस गोविंद ठाकरे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. ते सुरूवातीला भाजप कार्यकर्ते होते. तेजस ठाकरे यांच्या या राजकीय प्रवेशामुळे शिंदेसेनेला महागांव शहरासह तालुक्यात नक्कीच नवसंजीवनी मिळेल, असं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणुका होणार, भाजपला झटका बसण्याची शक्यता, कसं असेल गणित?

Rain Alert: पुढचे ८ तास महत्वाचे! महाराष्ट्रासह १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, राज्यात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT