Yavatmal News Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal News : रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेसाठी भीक मांगो आंदोलन; शिवसेना ठाकरे गट आक्रमक

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा पालिकेसाठी पाणी पुरवठा योजना मंजूर आहे. परंतु हि योजना अपूर्ण असल्याने शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले.

Rajesh Sonwane

संजय राठोड 

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा पालिकेसाठी पाणी पुरवठा योजना मंजूर आहे. परंतु हि योजना अपूर्ण असल्याने शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले. ठाकरे गटाच्या वतीने भीक मांगो आंदोलन करत तसेच आब्दोलनातून जमा झालेला निधी दारव्हा पालिका सीईओच्या खुर्चीवर ठेवण्यात आला. 

यवतमाळच्या (Yavatmal) दारव्हा पालिकेसाठी मंजूर असलेली ५० कोटी ३२ लाख रूपयांची पाणी पुरवठ्याचे काम त्वरीत व्हावे; यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे भीक मांगो आंदोलन करण्यात आले. शहर व पालिका परिसरात आंदोलन करत निधी संकलित करण्यात आला. संचलित केलेला निधी देण्यासाठी पालिकेत गेलेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यामुळे मुख्याधिकारी गायब झाल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. 

अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची 

शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यकर्त्यांची पाणी पुरवठा अभियंता सोबत पोलीस अधिकाऱ्यांसमोरच शब्दाधिक बाचाबाची झाली. जो पर्यत मुख्याधिकारी संकलित केलेला निधी स्वीकारणार नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याचा पदाधिकाऱ्यांचा पवित्रा होता. तर दिड तासापासून कॅबिनमध्ये ठिय्या आंदोलन सुरूच होते. दरम्यान पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तीन हजार सहाशे रुपये संकलित केलेला निधी मुख्याधिकाऱ्या खुर्चीवर ठेवला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT