Yavatmal News Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यात १० सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश; सण- उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Yavatmal News : गणेशोत्सवाला आजपासून सुरवात होत आहे. यानंतर आगामी दिवसात सण- उत्सव सुरु असतील. आजपासून वेगवेगळ्या उत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सव ५ सप्टेंबर रोजी ईद-ए मिलाद हे उत्सव साजरे करण्यात येणार आहे

Rajesh Sonwane

संजय राठोड 
यवतमाळ
: यवतमाळ जिल्ह्यात येणाऱ्या काळात विविध सण, उत्सव साजरे केले जाणार आहेत. या दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये. सर्व सण- उत्सव शांततेत साजरे व्हावे; यासाठी येत्या १० सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. यामुळे पुढील १४ दिवसात काही अनुचित प्रकार करणाऱ्यावर करडी नजर राहणार आहे. 

गणेशोत्सवाला आजपासून सुरवात होत आहे. यानंतर आगामी दिवसात सण- उत्सव सुरु असतील. यवतमाळ जिल्ह्यात देखील आजपासून वेगवेगळ्या उत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सव ५ सप्टेंबर रोजी ईद-ए मिलाद हे उत्सव साजरे करण्यात येणार आहे. या काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ व्हावे; यासाठी १० सप्टेंबरपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात पोलीस अधिनियम अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहे.

हिंगोलीत ६०० पेक्षा अधिक समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा पोलीस दलाने ६०० समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही केली आहे. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानंतर जिल्हाभरातील पोलीस स्थानकात ही कार्यवाही करण्यात आली आहे. दरम्यान गणरायाच्या आगमनावेळी निघणाऱ्या मिरवणुकीत गणेश भक्तांनी शांतता पाळावी व प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे; असे आवाहन देखील यावेळी हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे. 

पोलिसांची राहणार करडी नजर 

दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. तर हिंगोली जिल्ह्यात देखील समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार सॅन उत्सवाच्या काळात प्रामुख्याने गणेशोत्सवात होणाऱ्या गर्दीच्या काळात पोलिसांची यावर करडी नजर राहणार आहे. अनुचित प्रकार करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Devices: IPhone 17 लॉंच होताच, बंद होणार अ‍ॅप्पलचे 'हे' डिव्हाईस

पठाणकोटमध्ये २५ जवानांना कसं वाचवलं; अंगावर शहारे आणणारं रेस्क्यू ऑपरेशन | VIDEO

Shocking: भयंकर! तरुणाच्या गुद्दद्वारात अडकला पाईपचा तुकडा; एक्स-रे काढल्यानंतर डॉक्टरही चक्रावले

Horoscope Thursday : ५ राशींच्या वाटेतली विघ्न दूर होणार, स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणार; वाचा गुरुवारचे खास राशीभविष्य

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग बाईकचा थरार

SCROLL FOR NEXT