MSEDCL  Saam tv
महाराष्ट्र

वितरण कंपनीचा हलगर्जीपणा; शेतमजुराला कायमचे अपंगत्व

वितरण कंपनीचा हलगर्जीपणा; शेतमजुराला कायमचे अपंगत्व

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

यवतमाळ : शंभर रूपयांचा बील जरी थकीत झाले तरी वीज वितरण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी घरातील विद्युत मिटर काढून नेतात. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून वीज वितरण कंपनीच्या (MSEDCL) चुकीच्या धोरणामुळे शेतमजुर शेवटच्‍या घटका मोजत आहे. (yavatmal Negligence of the msedcl company Permanent disability of agricultural laborers)

शेतमजुर प्रमोद सिताराम नेवारे शेतात काम (Yavatmal News) करतांना ११ के.व्ही. सप्लाय करणारी खांबवरील विघुत तार तुटून अंगावर पडल्याने त्यात तो शेतमजुर युवक गंभीर भाजला गेला. यानंतर त्याला यवतमाळ आणि नागपूर (Nagpur) येथे उपचारासाठी हलविण्यात आले. ऑपरेशन झाल्यानंतर डावा हात आणि उजव्या हाताचा अंगठा तोडण्यात आले. आज तो शेतमजुर शेवटच्‍या घटका मोजत असताना अद्यापही वीज वितरण कंपनीने आर्थिक मदत तर लांबच पण साधे भेटण्याचे सौजन्य न दाखवल्याने परिसरातील नाजरिकांमध्ये वीज वितरण कंपनी विरोधात संताप व्यक्त केल्या जात आहे.

कोणतीही मदत नाही

यवतमाळच्या उमरी कापेश्वर येथील शेत (Farmer) मालक संदिप उपलेंचवार आणि शेतमजुर प्रमोद नेवारे हे दोघे २५ फेब्रुवारीला सकाळी जनावरांकरीता लावलेल्या सोलर बॅटरीच्या तारावर ११ के.व्ही. घुत वाहिनीची चालू तार खांबावरून तुटल्याने त्यात दोघांचा अपघात झाला. लागलेल्या आगीत शेतमालक संदिप उपलेंचवार याचा एका हाताचा अंगठा कापण्यात आला. मात्र उपलेंचवार यांच्या शेतात काम करणाऱ्या प्रमोद नेवारे हा प्रचंड भाजल्याने त्याचा एक हात आणि दुसऱ्या हाताचा अंगठा कापल्याने त्याला कायमाचे अपंगत्व आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून प्रमोद हा शेवटचा घटका मोजत असून देखील वीज वितरण कंपनीने त्याला कोणतीच आर्थिक मदत केलेली नाही. घरात डोळ्यांनी आणि शरीराने थकलेले आई– वडिल व एक लहान भाऊ सध्या प्रमोदला अपंगत्व आल्याने हतबल झाले असून प्रमोद हा घरातील करताहर्ता होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

Horoscope Sunday Update : विठ्ठलाच्या कृपेमुळे भाग्यकारक घटना घडतील, वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 14 जुलै रोजी विदर्भातील 6 हजारपेक्षा अधिक दारूचे बार राहणार बंद

SCROLL FOR NEXT