Yavatmal News Saam tv
महाराष्ट्र

'हर घर तिरंगा' अभियानासाठी शिक्षकांकडून घेताहेत प्रत्येकी ५०० रुपये, ते सुद्धा रोखीने!

'हर घर तिरंगा' अभियानासाठी शिक्षकांकडून घेताहेत प्रत्येकी ५०० रुपये, ते सुद्धा रोखीने!

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

यवतमाळ : हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत प्रत्येक शिक्षकाकडून ५०० रुपये आकारण्याचे शासन परिपत्रक यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्यात काढण्यात आले आहे. याबाबत शिक्षकांमध्‍ये याविषयीची प्रचंड नाराजी आहे. पण राष्ट्रभक्तीच्या नावाने कुणीही उघड बोलायला तयार नाही. (Yavatmal Today News)

एकीकडे ग्रामीण भागात (School) शाळांमध्ये मूलभूत सुविधा नाहीत, साहित्य नाही, ग्रामीण भागात अनेक शाळांचे छत गळत आहे. अशा अवस्थेत शिक्षण विभागाने ५०० रुपये तिरंगा निधी वसुलीचे फर्मान काढले आहे. जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून किती निधी गोळा होणार आहे व किती खर्च होणार आहे; याचा कुठेही ताळमेळ नाही. जिल्ह्यात किती घरांवर तिरंगा लावण्यात येणार आहे. त्यासाठी किती खर्च करण्यात येणार आहे. याचा कुठेच तपशील नाही. शिक्षण विभागाने शिक्षणासाठी एखादी योजना आणून त्यावर पैसे खर्च केले असते तर काही तरी परिणामकारक चित्र पहायला मिळाले असते. मात्र तसे होताना दिसत नाही.

जमा होणाऱ्या निधीचा ऑडिट हेाणार का?

ग्रामीण भागातील शाळा दुरूस्तीकरिता वरिष्ठ अधिकारी परिपत्रक काढणार आहेत का? विशेष म्हणजे पाचशे रूपये वसुल हे नगदीमध्ये होत आहेत. या विषयाला शिक्षक संघटनेने विरोधही केला. पाचशे रूपये आमच्या पगारातून घ्या असे देखील शिक्षकांनी वरिष्ठांनी सांगितले. मात्र अधिकाऱ्यांनी साफ नकार दिला. त्यामुळे जमा होणाऱ्या निधीचा ऑडिट कसे करणार? हा मोठा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

SCROLL FOR NEXT