Yavatmal Rain News Update:  Saamtv
महाराष्ट्र

Yavatmal News: 'मृत्यूनंतरही मरणयातना...' खांद्यावर मृतदेह घेऊन नदी ओलांडली अन् उरकला अंत्यविधी; यवतमाळमधील मन सुन्न करणारी घटना

Yavatmal Rain News Update: प्रशासनाच्या या आठमुठेपणामुळे जिवंतपणी नाहक त्रास सहन करावा लागत असताना मृत्यूनंतरही या यातना संपत नसल्याची खंत अन् संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Gangappa Pujari

संजय राठोड, ता. १६ जुलै २०२४

राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाच्या तडाख्याने अनेक नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे, ज्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशातच पावसाच्या तडाख्याने नदीला पूर आल्याने याच पाण्यातून चक्क अंत्ययात्रा काढावी लागल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, यवतमाळच्या कळंब तालुक्यातील जोडमोहा या गावातील यमुना भोयर यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. सोमवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. मात्र गावची स्मशानभूमी नदीच्या पलिकडे आहे.

तिथपर्यंत जायचे तर देवनाळा नदी ओलांडावी लागते. सततच्या पावसामुळे नदीला पूर आला होता. त्यामुळे आता अंत्यसंस्कार करणार कसे? असा प्रश्न गावकऱ्यांसमोर होता. शेवटी जीव धोक्यात घालून ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यातून तिरडीसह अंत्ययात्रा नेली. त्यानंतर अंत्यविधी करण्यात आला.

पुराच्या पाण्यामुळे अडलेला अंत्यसंस्कार शेवटी डोक्यावर तिरडी घेऊन नदीतून वाट काढत करण्यात आला. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून जोडमोहा गावच्या स्मशानभूमीचा प्रश्न रेंगाळला आहे. प्रशासनाच्या या आठमुठेपणामुळे जिवंतपणी नाहक त्रास सहन करावा लागत असताना मृत्यूनंतरही या यातना संपत नसल्याची खंत अन् संताप नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thigh length and diabetes: मांडीची लांबी सांगणार टाईप-२ मधुमेहाचा धोका? नव्या अभ्यासातून धक्कादायक संकेत

Dahi Handi Holiday : मोठी बातमी! दहीहंडीची सरकारी सुट्टी रद्द, आता 'या' सणाला मिळणार सुट्टी; वाचा फडणवीस सरकारचा निर्णय

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णवाहिका वाहन चालक आक्रमक

Maharashtra Cabinet Decision: फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय, भूसंपादन मोबदल्याच्या व्याजदरात केला बदल

शिंदेंना मुख्य नेता हे पद कुणी दिलं? धनुष्यबाण दिलाच कसा?, ठाकरेंच्या वकिलांचा आयोगावर शाब्दिक बॉम्ब, कोर्टात काय झालं?

SCROLL FOR NEXT