Child Marriage Saam tv
महाराष्ट्र

Child Marriage : अक्षता पडण्याआधी रोखले पाच बालविवाह; यवतमाळच्या प्रशासनाची एकाच दिवशी कारवाई

Yavatmal News : पुढील एक महिनाभर लग्नाच्या तारखा नसल्याने लग्नाचा धुमधडाका सुरु आहे. मात्र काहीजण मुलाचे किंवा मुलीचे लग्नाचे वय पूर्ण झाले नसताना देखील लग्न लावून देण्याच्या तयारीत असतात.

Rajesh Sonwane

संजय राठोड 

यवतमाळ : सध्या लग्नाचा धुमधडाका सुरु आहे. पुढे लग्नाच्या तारखा नसल्याने लग्न सोहळे उरकले जात आहेत. (Yavatmal) यवतमाळ येथे अशाच एका सामूहिक विवाह सोहळ्यात होत असलेले पाच बालविवाह (Child Marriage) रोखण्यात आले आहेत. जिल्हा बाल संरक्षण कक्षाने कारवाई केली आहे. (Latest marathi News)

पुढील एक महिनाभर लग्नाच्या तारखा नसल्याने लग्नाचा धुमधडाका सुरु आहे. मात्र काहीजण मुलाचे किंवा मुलीचे लग्नाचे वय पूर्ण झाले नसताना देखील (Marriage) लग्न लावून देण्याच्या तयारीत असतात. अशांवर बाल संरक्षण विभागाचे लक्ष असते. अशाच प्रकारे यवतमाळ जिल्हा बाल संरक्षण कक्षाने कारवाई करत एकाच दिवशी पाच मुलीचे बालविवाह रोखण्यात यश आले. हे विवाह यवतमाळमध्ये आयोजित एका सामूहिक विवाह सोहळ्यात केले जात असल्याचे समोर आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बाल विवाह होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली होती. त्यावरून यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील पिंपळशेंडा येथे आठ बालविवाह नियोजित होते असे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीच्या आधारावरून नववधूंच्या वयाची शहानिशा केल्यानंतर त्यात पाच बालिका ह्या अल्पवयीन असल्याचे समजल्याने विवाह रोखण्यात आले. दरम्यान पुढिल कारवाई जिल्हा बाल कल्याण विभागा करित आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

SCROLL FOR NEXT