Yavatmal News Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal News : पतंग उडवितांना दुर्दैवी घटना; अडकलेला पतंग काढताना शाॅक लागून बालकाचा मृत्यू

Yavatmal Arni News : मकरसंक्रांती येत असल्याने आतापासूनच पतंग उडविणे लहान मुलात क्रेझ निर्माण झाली आहे. लहान मुले घरच्यांना चकवा देऊन आपल्या घराच्या छतावर पतंग उडवित असतात.

Rajesh Sonwane

संजय राठोड

आर्णी (यवतमाळ) : महिनाभरावर मकरसंक्रांती आल्याने लहान मुले पतंग उडवीत आहेत. अशाच प्रकारे पतंग उडवीत असताना विद्युत तारेला अडकलेली पतंग काढताना मुलाचा विद्युत तारेला स्पर्श झाला. यामुळे विजेचा जोरदार झटका बसल्याने बारा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या आर्णी शहरातील गांधीनगर येथे घडली. 

रितेश संजय सुरजुसे (वय १२) असे शाॅक लागून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. मकरसंक्रांती येत असल्याने आतापासूनच पतंग उडविणे  लहान मुलात क्रेझ निर्माण झाली आहे. लहान मुले घरच्यांना चकवा देऊन आपल्या घराच्या छतावर पतंग उडवित असतात. शिवाय विदुयत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करत असतात. यातूनच दुर्दैवी घटना घडत असतात. 

यवतमाळच्या आर्णी शहरातील गांधीनगर येथील १२ वर्षीय बालक रितेश संजय सुरदुसे हा सकाळी घराच्या छतावर पंतग उडवित होता. पतंग उडवत असतांना त्याची पतंग घराच्या भिंतीला लागुन असलेल्या ईलेट्रीक पोलच्या तारांमध्ये अडकली. यामुळे अडकलेला पतंग काढण्यासाठी त्याने कुठलाही विचार न करता त्या ईलेट्रीक तारात अडकलेली पंतग काढण्याचा प्रयत्न केला. यात त्याला जबर विदुयत शॉक लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यृ झाला.  

घडलेला प्रकार घरच्यांच्या लक्षात आल्याने त्याला ग्रामिण रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषीत करण्यात आले. काही वर्षापूर्वीच वडीलांचे छत्र हरविलेल्या रितेशने सुध्दा अपघाती मृत्यृ झाल्याने कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. रितेश याचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या आईने एकच आक्रोश केला. परिवारात आजी, आई आणी मतीमंद मोठा भाऊ आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT