Yavatmal Truck And Car Accident Saam Tv
महाराष्ट्र

Yavatmal Accident Video: नागपूर-यवतमाळ महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात, ४ भाविकांचा जागीच मृत्यू

Yavatmal Truck And Car Accident: यवतमाळ -नागपूर महामार्गवरील चापरडा गावाजवळ सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे.

Priya More

संजय राठोड, यवतमाळ

यवतमाळमधून भीषण अपघाताची (Yavatmal Accident) घटना समोर आली आहे. नागपूर-यवतमाळ महामार्गावर (Nagpur-Yavatmal Accident) कार आणि ट्रकला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. यवतमाळच्या चापरडा गावाजवळ हा अपघात झाला. या अपघाताचा तपास यवतमाळ पोलिसांकडून (Yavatmal Police) सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ -नागपूर महामार्गवरील चापरडा गावाजवळ सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. भरधाव कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेले सर्वजण पंजाबमधील आहेत. पंजाब येथील शीख कुटुंब नांदेड येथे दर्शनसाठी जात होते. यवतमाळमार्गे ते नांदेडला जात असताना भीषण अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच यवतमाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO: हळद लावली, पाया पडला आणि...! कुलदीच्या हळदी समारंभात चहलची मस्ती, पाहा व्हिडीओ

FASTag Pass: फास्टॅग पासच्या किंमती वाढल्या; १ एप्रिलपासून लागू; किती पैसे मोजावे लागणार?

Maharashtra Live News Update : नागपूरमध्ये मेट्रोचा गर्डर तुटून अपघात

Aishwarya Narkar : "कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून..."; ट्रोल करणाऱ्यांना प्रसिद्ध अभिनेत्रीने सुनावले खडेबोल, थेट स्क्रीनशॉट केले शेअर

भरधाव कारने तरुणीला फुटपाथवर चिरडले, २०० मीटर फरफटत नेलं; बाईक, रिक्षा अन् कारला धडक; थरार सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT