Yavatmal Pusad Taluka News  Saam TV
महाराष्ट्र

Yavatmal News: खेळता-खेळता मुलांनी सिमेंटचा पाईप ढकलला; चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दबून मृत्यू

Pusad Taluka News: क्रिकेटचे पीच तयार करण्यासाठी आणलेल्या सिमेंटचा पाईपखाली दबून चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात घडली.

Satish Daud

संजय राठोड, साम टीव्ही यवतमाळ

Yavatmal Pusad Taluka News

क्रिकेटचे पीच तयार करण्यासाठी आणलेल्या सिमेंटचा पाईपखाली दबून चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात घडली. आर्यन जयेश चव्हाण (वय १०) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन हा वडसद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील इंदापूर (Yavatmal News) येथील रहिवासी असून आई-वडील ऊस तोडीवर गेले असता त्यांनी मुलाला आपल्या आजी-आजोबाकडे शिक्षणासाठी ठेवले होते.

शनिवारी (३ फेब्रुवारी) शाळा सुटल्यानंतर आर्यन आपल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी शेतशिवारात गेला. त्याठिकाणी काही तरुणांनी क्रिकेटची पीच तयार करण्यासाठी मोठा सिमेंटचा पाईप आणला. (Latest Marathi News)

आर्यन आणि त्याचे मित्र या पाईपवर चढून खेळू लागले. दरम्यान, खेळता-खेळता काही मुलांनी सिमेंटचा पाईप ढकलला. त्यामुळे आर्यन धाडकन जमिनीवर कोसळला. काही क्षणातच त्याच्या अंगावरुन सिमेंटचा पाईप गेला.

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आर्यनचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर मुलांनी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस तपास करत आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Madhuri Dixit: धकधक गर्लचं लाजवाब सौंदर्य, फोटो पाहताच घायाळ व्हाल

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

SCROLL FOR NEXT